निकालाआधीच दहावीच्या विद्यार्थ्याचा समुद्रात बुडून मृत्यू

 Juhu
निकालाआधीच दहावीच्या विद्यार्थ्याचा समुद्रात बुडून मृत्यू

दहावीच्या निकालाच्या प्रतिक्षेत असलेल्या एका विद्यार्थ्याचा जुहूच्या समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. जयेश पेडणेकर असे या मुलाचे नाव आहे.

सांताक्रूझ येथे राहणारा जयेश रविवारी दुपारी आपल्या चार मित्रांसोबत जुहू चौपाटीवर पोहायला गेला होता. पोहण्याच्या नादात जयेश खोल पाण्यात शिरला. परंतु खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडायला लागला. जयेश पाण्यात बुडत असल्याचे बघून सोबतच्या मित्रांनी त्वरीत पोलिसांना बोलावले. पोलिसांसोबतच अग्निशमन दलातील जवान आणि तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर देखील चौपाटीवर दाखल झाले. तोपर्यंत एका व्यक्तीने समुद्रात उडी मारुन जयेशला बाहेर काढले. त्यानंतर त्याला अग्निशमन दलाच्या मदतीने कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Loading Comments