वडाळ्यातील मंदिरावर कारवाईत पोलिसांवर दगडफेक


वडाळ्यातील मंदिरावर कारवाईत पोलिसांवर दगडफेक
SHARES

वडाळा - वडाळ्यातील पिंपळेश्वर महादेव मंदिरावर कारवाई सुरू असताना पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेत 5 पोलीस जखमी झाले असून त्यात एका महिला पोलिसाचा समावेश आहे. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलिसांनी 7 महिलांसह 4 पुरुषांना अटक केली असून 15 महिला आणि 25 पुरुष फरार असल्याचं सांगितलं जातंय. दगडफेकीत पोलीस निरीक्षक अाप्पासाहेब कोळी, हवालदार सुनील गायकवाड, महेश देसाई, शिपाई निखिल चव्हाण जखमी झाले असून महिला पोलीस शिपाई सुनीता पाटील यांच्या डोक्यात दगड लागल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, या दगडफेकीनंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमारही केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय