फरीद तनाशाच्या मारेकऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा

फरीद तनाशा याच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या ११ आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. यामध्ये सहा जणांना जन्मठेपेची तर उर्वरित पाच दोषींना दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

SHARE

कुख्यात गुंड छोटा राजन याचा खास हस्तक म्हणून ओळखला जाणारा फरीद तनाशा याच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या ११ आरोपींना मकोका न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. यामध्ये सहा जणांना जन्मठेपेची तर उर्वरित पाच दोषींना दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


या आरोपींना शिक्षा 

जफर राझी आलम खान, मोहम्मद साकीब खान, रविप्रकाश सिंह, पंकज सिंह, रणधीर सिंह, मोहम्मद रफीक शेख, रवींद्र सिताराम वारेकर, विश्वनाथ शेट्टी, दत्तात्रय भाकरे, राजेंद्र चव्हाण, दिनेश भंडारी


संपूर्ण प्रकार

फरीद तनाशा हा टिळक नगरमधील इमारत क्र. ८७ मध्ये तळमजल्यावर खोली क्रमांक दोनमध्ये पत्नी आणि आपल्या मुलीसोबत राहत होता. २०१० मध्ये रात्री ९.४५ च्या सुमारास दोन हल्लेखोरांनी फरीदच्या घरात घुसून त्याच्या पत्नीसमोरच ७.६५ मेकच्या रिव्हॉल्वरमधून पाच गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. त्यावेळी तनाशाचा वैयक्तिक अंगरक्षक नेमका त्याचवेळी बाहेर गेला होता. टोळीतील अंतर्गत वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती त्यावेळी पुढे आली होती.


९ लाख रुपयांसाठी हत्या

याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांना अटक केली होती. यामध्ये जफर राझी आलम खान, मोहम्मद साकीब खान, रविप्रकाश सिंह, पंकज सिंह, रणधीर सिंह, मोहम्मद रफीक शेख या सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ९ लाख रुपयांना तनाशाच्या हत्येची सुपारी आणि कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी विकासक दतात्रय भाकरे, हॉटेल मालक विश्वनाथ शेट्टी, रवींद्र वरेकर, राजेंद्र चव्हाण, आणि दिनेश भंडारी यांना अटक केली होती. या पाच जणांना मकोका न्यायालयाने दहा वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. यामध्ये भाकरे याच्या सांगण्यावरून वरेकर हा फक्त पैसे देण्यासाठी गेला होता, अशी माहिती अॅड. नितीन कांबळे आणि अॅड. पंकज मोरे यांनी दिली आहे.


हेही वाचा - 

इक्बाल कासकरची पुन्हा तुरुंगात रवानगी

कन्नड अभिनेत्री मारिया विरोधात आणखी एक गुन्हा

संबंधित विषय
ताज्या बातम्या