COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

कन्नड अभिनेत्री मारिया विरोधात आणखी एक गुन्हा

कन्नड अभिनेत्री मारिया सुसायराज पुन्हा एकदा पोलिसांच्या तावडीत सापडली आहे. ठाण्यातील एका व्यावसायिकाला ३ कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी मारियासह परोमिता चक्रवर्ती आणि अन्य दोघांवर पवई पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कन्नड अभिनेत्री मारिया विरोधात आणखी एक गुन्हा
SHARES

नीरज ग्रोवर हत्याकांड प्रकरणात अडकलेली कन्नड अभिनेत्री मारिया सुसायराज पुन्हा एकदा पोलिसांच्या तावडीत सापडली आहे. ठाण्यातील एका व्यावसायिकाला ३ कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी मारियासह परोमिता चक्रवर्ती आणि अन्य दोघांवर पवई पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काय आहे प्रकरण?

नीरज ग्रोव्हर यांच्या हत्येच्या आरोपात ३ वर्षांची शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या मारियानं आपल्या एका मैत्रिणीसोबत ट्रॅव्हल्स एजन्सी सुरू केली. तिनं हजला जाणार्‍या यात्रेकरूंची जवळपास २ कोटींपेक्षा जास्त रुपयांची विमानाची तिकीटं बूक केली होती. पण ऐनवेळी ती सर्व तिकीटं रद्द करुन मरियानं पोबारा केला. परिणामी हज यात्रेकरुंना यात्रेलाही जाता आलं नाही. त्यामुळे तिच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


व्यावसायिकालाही फसवलं

सोबतच मारियाने ठाण्यातील एका व्यावसायिकाला कर्ज देण्याच्या नावाखाली ३ कोटींना गंडवल्याने पवई पोलिस ठाण्यात नुकताच तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोण आहे मारिया?

मारिया ही एक कन्नड अभिनेत्री होती. ६ मे २००८ रोजी एका प्रॉडक्शन हाऊसचा एक्झिक्युटिव असलेल्या नीरज ग्रोव्हरची मारिया सुसायराजच्या मालाडमधील फ्लॅटमध्ये हत्या झाली होती. नीरज ग्रोव्हरची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न मारियाने केला होता.


गुन्हेगारी पार्श्वभूमी

  • मे २००८ मध्ये झाली होती प्रोड्युसर नीरज ग्रोव्हरची हत्या
  • ग्रोव्हर हत्याकांड प्रकरणात दोषी
  • पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली ३ वर्षांची शिक्षा
  • मारियाचा मित्र मॅथ्यूने केला होता नीरजचा खून
  • नीरजच्या शरीराचे तुकडे करून जाळण्यात आल्याने प्रकरण चर्चेत
  • जुलै २०११ मध्ये मारिया शिक्षा भोगून जेलबाहेर आलीहेही वाचा-

उकाड्यामुळे घराच्या खिडक्या उघडं ठेवून झोपणं पडू शकतं महागात

मालवणीत दिराने केली वहिनीची हत्याRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा