उकाड्यामुळे घराच्या खिडक्या उघडं ठेवून झोपणं पडू शकतं महागात


उकाड्यामुळे घराच्या खिडक्या उघडं ठेवून झोपणं पडू शकतं महागात
SHARES

मुंबईत वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या वेळीस घरात हवा खेळती रहावी म्हणून दरवाजा किंवा दाराच्या खिडक्या उघडं ठेवून झोपत असाल तर सावधान.... कारण भूरटे चोर तुमच्या घरातल्या वस्तूंची चोरी करून कधी पसार होतील याचा तुम्हाला पत्ताही लागणार नाही. नुकतीच शिवडी पोलिसांनी अशा प्रकारे चोरी करणाऱ्या दोन सराईत मोबाईल चोरांना अटक केली आहे. मागील अनेक दिवसांपासून त्या परिसरात वाढत्या मोबाईल चोरीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. या चोरांकडून पोलिसांनी 11 मोबाईल हस्तगत केले आहेत.


संपूर्ण प्रकार

सध्या उन्हाळ्यामुळे अनेक चाळी तसेच इमारतींमधील रहिवासी हवा खेळती राहावी म्हणून दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवतात. शिवडीच्या जयभीमनगर येथील दारुखाना परिसरात राहणाऱ्या अफजल मन्सूर शेख यांनी देखील 14 मे रोजी उकाडा होत असल्याने घराची खिडकी अर्धवट उघडी ठेवून झोपले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांचे दोन मोबाइल चोरून नेले. याप्रकरणी अफजल यांनी शिवडी पोलिसांत तक्रार नोंदवली. दरम्यान परिसरात चोरी करणारे दुसरे कुणी नसून निजामुद्दीन अब्दुल शेख (23), शाहीद सुब्रती शेख (21) हे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी केली.


अखेर गुन्हा केला कबूल

त्या दोन्ही चोरांनी चोरीची कबुली दिली नाही. अखेर पोलिसांनी त्यांच्या सचबोल पट्ट्याचा हिस्का दाखवल्यानंतर दोघांनी परिसरात विविध ठिकाणी केलेल्या चोरींची कबुली दिली.

पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे 11 मोबाइल हस्तगत केले असून या दोघांच्या चौकशीतून अन्य चोरीचे गुन्हे देखील उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी अधिक तपस सुरू असल्याचं शिवडी पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.


पोलिसांचं आवाहन

वाढत्या गर्मीमुळे घरात हवा खेळती राहण्यासाठी अर्धवट दरवाजा किंवा खिडकी उघडी ठेवून झोपणे चुकीचं आहे. तसेच इमारत किंवा चाळ परिसरात सतर्क राहणे गरजेचं असून संशयित व्यक्ती आपल्या भागात फिरताना आढल्यास पोलिसांशी संपर्क साधा असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा