COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

मालवणीत दिराने केली वहिनीची हत्या

दिराने आपल्या वहिनीची हत्या केल्याची घटना मालवणीतल्या ठाकूर कॉटेज लॉजमध्ये सोमवारी उघडकीस आली. हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव इंदू तातड (३०) असून आरोपी हरिशभाई तातडने गुजरात पोलिसांसमोर हत्येची कबुली दिली आहे.

मालवणीत दिराने केली वहिनीची हत्या
SHARES

दिरानेच आपल्या वहिनीची हत्या केल्याची घटना मालवणीतल्या ठाकूर कॉटेज लॉजमध्ये सोमवारी उघडकीस आली. हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव इंदू तातड (३०) असून आरोपी हरिशभाई तातडने गुजरात पोलिसांसमोर हत्येची कबुली दिली आहे.


आरोपीविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी मालवणी पोलिसांनी हरिश याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला असून पोलिसांचं पथक हरिशचा ताबा घेण्यासाठी गुजरातला गेले असल्याची माहिती मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी दिली आहे.


अशी केली हत्या

हरिश तातड आणि इंदू तातड हे दोघे मूळचे गुजरातचे असून सोमवारी मालवणी येथील एका नातेवाईकांकडे राहायला आले होते. त्यावेळी हरिशने नातेवाईकांना बाहेर फिरायला जातोय असं सांगून इंदूला ठाकूर कॉटेज लॉजमध्ये घेऊन गेला आणि इंदूची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो तिथून गुजरातला पळाला. गुजरातला गेल्यावर त्याने नवसारी जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात हत्येची कबुली दिली. मात्र, या हत्येचं कारण अद्याप समजलेलं नसून हरिशचा ताबा घेण्यासाठी मालवणी पोलिसांचं एक पथक गुजरातला रवाना झालं आहे.


आणखी एक धक्कादायक घटना

मालवणी पोलिसांनी या घटनेचा तपास करून खासगी रुग्णवाहिकेच्या सहाय्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलं. यावेळी या रुग्णवाहिकेचा चालक पंकज सिंह ती रुग्णवाहिका मालवणी पोलिस ठाण्याजवळ घेऊन गेला. त्यावेळी पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांनी ही रुग्णवाहिका इथे कशी आली? असe प्रश्न विचारल्यावर चालक पंकज याने रुग्णवाहिका रुग्णालयात नेण्यासाठी जोरात मागे वळवली. यामध्ये एका पोलिस जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी चालकावर रश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा