अल्पवयीन मुलाचं शारिरीक शोषण

Kandivali
अल्पवयीन मुलाचं शारिरीक शोषण
अल्पवयीन मुलाचं शारिरीक शोषण
See all
मुंबई  -  

कांदीवली - समतानगर येथील हनुमाननगर परिसरात अल्पवयीन मुलाचं शारिरीक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शशिकांत मिश्रा असं या नराधमाचे नाव असून, त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीवर कलम 377,4,8,12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडिताला घेऊन त्याचे वडील उपचार करण्यासाठी उत्तरप्रदेश मधून मुंबईत आले होते. मुंबईत कुणी नसल्याने आपला मित्र शशिकांत उर्फ बबलू अशोक मिश्रा याच्या घरी मुलाला घेऊन ते रहायला आले होते. 20 तारीखला ते आपल्या मुलाला एकटं सोडून शौचालयास गेले असता शशिकांतने त्यांच्या मुलावर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडिताच्या वडिलांनी केला आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.