जे.जे पोलिस ठाण्यातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन


जे.जे पोलिस ठाण्यातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन
SHARES
महाराष्ट्रात नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वाकोल, वडाळानंतर सोमवारी जेजे पोलिस ठाण्यातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाच बाधा झाल्याचे पुढे आले आहे. आतापर्यंत राज्यातील 422 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यात मुंबई पोलिसांची संख्या सर्वाधिक आहे.

दक्षिण मुंबईच्या ज्या विभागाची जबाबदारी  जे.जे पोलस  ठाण्यावर आहे. त्या ठिकाणी सर्वाधिक कन्टेन्मेट झोन आहेत. या कन्टेन्मेट झोनमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र हे पोलिस कर्मचारी तैनात होते. यातून त्यांना ही बाधा झाल्याचे बोलले जाते. नुसता कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर एका पोलिस उपायुक्ताला ही या रोगाने सोडलेले नाही. या कोरोना बाधित रुग्णांमध्ये 6 पोलिस अधिकारी आणि 6 कर्मचाऱ्यांचा समावेश असून या 12 जणांच्या संपर्कातील 48 जणांना विलगीरण कक्षात ठेवण्यात आले आहे. एका वरिष्ठ अधिका-याने या बातमीला दुजोरा दिला आहे.

राज्यात आता एकूण 422 पोलिस कोरोनााधीत आहेत. एकट्या मुंबईत 211 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये पोलीस कर्मचा-यांचा  मोठ्या प्रमाणांत समावेश आहे. याशिवाय 51 पोलिस अधिका-यांही कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत तीन पोलिस कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 49 कोरोना बाधीत पोलिस उपचार घेऊन घरी परतले  आहेत. मुंबई पोलिसांनी नुकतीच पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष कोविड हेल्पलाईन सुरू केली आहे. सध्या मुंबईत 150कोरोनाग्रस्त पोलिस उपचार घेत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा