ओशिवाऱ्यात 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपी फरार

 Anand Nagar
ओशिवाऱ्यात 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपी फरार
Anand Nagar, Mumbai  -  

ओशिवरा - पोलीस ठाणे हद्दीत 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका अज्ञात नराधमाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण या घटनेमुळे जोगेश्वरी (प.) इथल्या आनंदनगर परिसरातल्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोमवारी 20 मार्चच्या रात्री 11 वाजेदरम्यान पीडित मुलीला पैशाचं आमिष दाखवून एका अज्ञात व्यक्तीने आनंदनगर येथील दत्त कॉ-ऑप सोसायटीच्या एसआरए इमारतीच्या छतावर नेले. त्यानंतर मुलीला मोबाइलमधून अश्लील फिल्म दाखवून नराधामाने तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यावेळी मुलीने आरडा-ओरडा केल्यानंतर तिथल्या रहिवाशांनी धाव घेत शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोडकळीस आलेल्या इमारतीत विद्युत दिवे नसल्याने अंधाराचा फायदा घेत आरोपीने पळ काढल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात आलं.

अज्ञात इसमाविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 376(2)(1)377, 506 पार्ट 2 आणि 6, 12 आणि 14 पोस्को या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तापास आय. ओ. शिवाजी शिंदे आणि पी. एस. आय. राजाराम पाटील करत आहेत.

Loading Comments