अथर्वच्या मृत्यूप्रकरणी १२ मित्र ताब्यात


अथर्वच्या मृत्यूप्रकरणी १२ मित्र ताब्यात
SHARES

मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांच्या मुलाची मंगळवारी रात्री आरे कॉलनीत हत्या करण्यात आली. अथर्व शिंदेचा मृतदेह स्थानिकांना आरे कॉलनी येथील तलावाजवळ आढळला. मैत्रिणीच्या बर्थडेसाठी मंगळवारी घराबाहेर पडलेल्या अथर्वच्या संशयास्पद मृत्यूने पोलिस ही गोंधळले आहेत. त्यामुळेच या हत्येचा उलघडा करण्यासाठी पोलिसांनी आता बर्थडे गर्लसह त्याच्या १२ मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.


कोण आहे अथर्व?

आरे कॉलनीतील रॉयल पाम परिसरता अथर्व हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. अथर्वने पुण्यातून साऊण्ड इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यानंतर तो घरूनच काम करत होता. अर्थव आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीसाठी तो मंगळवारी सायंकाळी घराबाहेर पडला आणि तो परतलाच नाही.


मृतदेहावर काही संशयास्पद खुणा

याप्रकरणी नरेंद्र यांनी आरे पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद केली होती. अखेर आरे जंगलातील तलावाजवळ स्थानिक रहिवाशांना अथर्वचा मृतदेह मिळून आला. अथर्वच्या मृतदेहावर काही संशयास्पद खुणा पोलिसांना आढळून आल्याने त्याची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं.


१२ जण चौकशीसाठी ताब्यात

या हत्येचा उलघडा लावण्यासाठी पोलिस अतोनात प्रयत्न करत आहेत. ज्या मैत्रिणीची बर्थडे पार्टी होती, ती एका मराठी चित्रपट निर्मात्याची मुलगी असल्याचं कळतं. तिच्यासह पोलिसांनी १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ज्या बंगल्यात या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्या बंगल्याच्या केअरटेकर आणि स्टाफलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. ही सर्व मुलं उच्चभ्रू कुटुंबातील आहेत. पार्टीला आलेल्या बहुतांश तरुणांनी मद्यपान किंवा ड्रग्जचं सेवन केलं असल्याची माहिती पुढे आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा