भिवंडीत जिलेटिनच्या तब्बल १२ हजार कांड्या जप्त

एवढा मोठा स्फोटकांचा साठा पाहून पोलिसांनाही धक्का बसला. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

भिवंडीत जिलेटिनच्या तब्बल १२ हजार कांड्या जप्त
SHARES

भिवंडीतून जिलेटिनच्या तब्बल १२ हजार कांड्या आणि ३ हजार आठ डिटोनेटरचा साठा जप्त करण्यात आल्या आहेत. ठाणे गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकानं ही कारवाई केली आहे. एवढा मोठा स्फोटकांचा साठा पाहून पोलिसांनाही धक्का बसला.  या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. 

ठाणे गुन्हे शाखा युनिट १ च्या अधिकाऱ्यांना मित्तल इंटरप्राइजेसच्या गोदामात स्फोटके असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दीड वाजेच्या सुमारास भिवंडी कारवली गाव इथे धाड टाकली. यावेळी पोलिसांनी ६० खोक्यांमध्ये जिलेटिनच्या तब्बल १२ हजार कांड्या जप्त केल्या. त्याचबरोबर ३००८ डेटोनेटर्सही आढळले.  बॉम्ब शोधक आणि नाशक पथकालादेखील घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं. याठिकाणी ही सर्व स्फोटकं अवैधरित्या साठवली होती. ती जप्त करून वाडा येथील सेफ हाऊस मध्ये ठेवण्यात आली आहेत.

पोलिसांनी या प्रकरणी  गुरुनाथ काशीनाथ म्हात्रे (५३) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयानं २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हात्रे व्यवसायानं खाणी आणि बिल्डिंग मटेरियल सप्लायर आहेत. त्यासाठी हा माल साठवला असल्याची शक्यता वर्ताविण्यात येत आहे. मात्र हा माल अनधिकृतरित्या साठा करून ठेवला असल्याने त्यांच्यावर संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 या स्फोटकांची एकूण किंमत २ लाख २ हजार ६२० रुपये आहे. २५ किलो वजनाच्या एकूण ६० बॉक्समध्ये ११ हजार ४०० जिलेटीनच्या कांड्या असून वजन दीड हजार किलो आहे. या साठ्याची किंमत दीड लाख आहे. इतरतीन बॉक्समध्ये प्रत्येकी २०० प्रमाणे एकूण ६०० जिलेटीनच्या कांड्या असून वजन ७५ किलो आहे. याची किंमत ७ हजार ५०० रुपये आहे. ३००८ इलेक्ट्रिक डिटोनेटरची किंमत ४५ हजार १२० रुपये आहे. 



हेही वाचा - 

मुंबईच्या पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त किनारपट्टीची पाहणी

चक्रीवादळानंतरही मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा