पालिकेचे अधिकारी असल्याचे सांगून १३ वर्षीय मुलाचे अपहरण, मागितली १० लाखाची खंडणी


पालिकेचे अधिकारी असल्याचे सांगून १३ वर्षीय मुलाचे अपहरण, मागितली १० लाखाची खंडणी
SHARES

मालाड परिसरात पालिकेचे अधिकारी असल्याचे सांगून दोघांनी १३ वर्षीय मुलाचे अपहण केले. त्या मुलाला निर्जनस्थळी नेहून आरोपींनी मुलाच्या बापाकडे चक्क १० लाखांची खंडणी मागितली. घाबरलेल्या मुलाच्या बापाने पोलिसांची मदत घेतल्यानंतर मालाड पोलिसांनी उत्कृष्ठ रित्या तपास करून अवघ्या एका तासात आरोपींना शोधून काढत अटक केली आहे. दिव्यांशी शर्मा (२१), शेखर विश्वकर्मा (३५) अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. 

हेही वाचाः- मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरतेय..!

मालाडच्या रूस्तमजी रिजेन्सी आदर्श कार्मेलजवळून क्रिकेट खेळून १३ वर्षाचा अल्पवयीन मुलगा हा घरी जात होता. त्यावेळी तोंडाला मास्क नसल्याचे कारण सांगत आरोपींना त्याची वाट अडवली. त्यावेळी दोघा आरोपींनी स्वतःची ओळख ही पालिका कर्मचारी असल्याचे सांगितले. दोघांनी कारवाई करण्याच्या नावाखाली मुलाला कांदिवली लिंक रोड परिसरातील एका निर्जनस्थळी नेले. त्यावेळी मुलाला दोघांनी जिवे ठार मारण्याची भिती घातली. तसेच मुलाकडून त्याच्या वडिलांचा नंबर घेत आरोपींनी मुलाच्या वडिलांना फोन केला. तसेच मुलाच्या सुटकेसाठी आरोपींनी मुलाच्या वडिलांकडे १० लाख रुपये खंडणी मागितली.

हेही वाचाः- मुंबईत परजिल्ह्यातून येणारे दूध भेसळमुक्त; दुधाचा दर्जाही  कमी प्रतीचा

मुलाचे अपहण झाल्याचे समजताच त्याच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यावेळी मुलाच्या बापाने मालाड पोलिसात धाव घेत पोलिसांकडे मदत मागितली. गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून पोलिस कामाला लागले. कोणताही पुरावा नसताना अवघ्या एका तासात किल्ष्ठ गुन्हा सोडवून आरोपींना अटक केली. या मुलाचा ताबा पोलिसांनी त्याच्यापालकांना दिला आहे. या आरोपींवर मालाड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा