अंधेरीत भर रस्त्यात १४ लाखांचा दरोडा


अंधेरीत भर रस्त्यात १४ लाखांचा दरोडा
SHARES

मुंबईच्या अंधेरी येथे खासगी कंपनीच्या कलेक्शन एजंटकडून 14 लाखांची रोकड भर रस्त्यात पळवल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या अंधेरी पोलीस तसेच गुन्हे शाखा या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.


दरोडेखोरांनी 14 लाखांची ऐवज केली लंपास 

सोमवारी संध्याकाळी एका खासगी कंपनीचे दोन कलेक्शन एजंट कलेक्शन करून वांद्रेच्या दिशेने आपल्या बाईकवरून जात होते. संध्याकाळी 5.45 च्या दरम्यान हे दोघे पश्चिम द्रुतगती मार्गावरील अंधेरी पुलावरून जात असताना अचानक एका बाईकने त्यांचा रस्ता अडवला, तेवढ्यात दुसरी एक बाईक देखील त्यांच्या मागे येऊन थांबली. त्यानंतर या दोन बाईवर असलेल्या चौघांनी दोघा कलेक्शन एजंटकडून बळजबरीने त्यांची बॅग घेतली आणि घेऊन पसार झाले. या बागेत १४ लाखांची रोकड असल्याचं समजतं.


चोरांनी असा रचला कट

असे सांगितलं जातं आहे की, काळ्या आणि लाल रंगाच्या बाईकवरून हे चौघे आले होते. ज्या पद्धतीने ऐन रस्त्यात हा दरोडा टाकण्यात आला त्यावरून आरोपींना कलेक्शन एजंटकडे असलेल्या रोकडची संपूर्ण कल्पना होती आणि कट रचूनच हे सगळं पार पडल्याचं अंधेरी पोलिसांनी सांगितलं आहे. या दरोड्यामध्ये अंधेरी पोलिसांनी कलेक्शन एजंटच्या ओळखीच्या व्यक्तीचा हात असल्याची शक्यता वर्तवली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा