पूर्ववैमनस्यातून काढला वचपा

 Kurla
पूर्ववैमनस्यातून काढला वचपा

कुर्ला - दीड वर्षाचा राग धरून एका तरुणाने मैत्रिणीच्या वडिलांची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दीड वर्षापूर्वी आरोपीने रशीद शेख यांच्या मुलीची छेड काढली होती. त्यामुळे शेख यांनी आरोपीला मारहाण केली होती. याच वादातून आरोपीने ही हत्या केल्याचं शेख यांच्या पत्नी सायरा यांनी पोलिसांना सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र घटनेनंतर आरोपीने पळ काढला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Loading Comments