सुदृढ प्रवाशांवर होणार कारवाई

 Dadar
सुदृढ प्रवाशांवर होणार कारवाई

मुंबई - मुंबईत अनेकदा घाईने ऑफिसला जाणारी मंडळी अपंगांच्या डब्यात प्रवास करतात. याचा त्रास अपंगाना होतो. त्यामुळे अपंगांसाठी राखीव डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या आरपीएफकडून बुधवारपासून कारवाई केली जात आहे. दोन दिवसांत केलेल्या कारवाईत 160 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. यात 20 सरकारी कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. आणखी दोन आठवडे ही कारवाई चालाणार आहे. या कारवाईमुळे अपंग लोकांना त्यांच्या हक्काची जागा मिळेल यात काही शंका नाही. या कारवाईमुळे टिसीच्या नजरा चुकवून प्रवास करणा-या प्रवाशांनाही चांगलाच धडा मिळेल.

Loading Comments