गळफास घेऊन मुलीची आत्महत्या

 Cheetah Camp
गळफास घेऊन मुलीची आत्महत्या

ट्रॉम्बे - ट्रॉम्बे चिता कॅम्प डी सेक्टरमध्ये सोमवारी पहाटे अल्पवयीन मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालंय. इस्मात शेख (17) असं या मुलीचं नाव आहे. आई आणि चार लहान भावंडांसह ती राहत होती. तिचे वडील कामानिमित्त कोलकत्याला असतात. घराच्या पोटमाळ्याला ओढणी बांधून तिनं आत्महत्या केलीय. पोलिसांनी इस्मातचा मृतदेह घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलाय. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही.

Loading Comments