विहार तलावात १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

रविवारी सायंकाळी तलावात काही मुले पोहण्यासाठी उतरली होती. त्यावेळी हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विहार तलावात १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू
SHARES

मुंबईला पाणीपुरवठा करणारे विहार तलावात बुडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. रफिक हसन सय्यद असे या मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचाः- भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

विहार तलाव हे मुंबईला पाणीपुरवठा करणारे महत्वाचे तलाव म्हणून ओळखले जाते.  रविवारी सायंकाळी तलावात काही मुले पोहण्यासाठी उतरली होती. त्यावेळी हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रफिक पाण्याची बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी रफिला शोधून काढत, त्याला तातडीने उपचारासाठी जवळील शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र डाँक्टरांनी त्याला तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले.  या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित विषय