देशातील दिग्गज कर्ज बुडवे ईडीच्या रडारवर

अनील अंबानी यांचा(एडीएजी), दिवाण हौसिंग फायनान्स कंपनी (डीएचएफएल), आयएल अॅण्ड एफएस समूह, इंडिया बूल्स, खेतान समूह यांचा समावेश आहे.

देशातील दिग्गज कर्ज बुडवे ईडीच्या रडारवर
SHARES

मुंबईत एका मागोमाग एक घोटाळे पुढे येऊ लागल्यानंतर कर्जबाजारी झालेल्या उद्योगपत्यांच्या मुस्क्या आवळण्यास ईडीने सुरूवात केली आहे. येस बँक गैरव्यवहारानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ११ मोठ्या उद्योग समुहांवर लक्ष केंद्रीत केले आहे.  या ११ समुहांनी बँकेकडून ४२ हजार १३६ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन ते बुडवले आहे. यामध्ये अनील अंबानी यांचा(एडीएजी),  दिवाण हौसिंग फायनान्स कंपनी (डीएचएफएल), आयएल अॅण्ड एफएस समूह, इंडिया बूल्स, खेतान समूह यांचा समावेश आहे. या सर्वांवर परदेशी रक्कमेचा गैरवापर होऊन 'मनी लॉन्डरिंग' केल्याचा ईडीचा संशय आहे.

हेही वाचाः- Corona virus : कोरोनामुळे आरटीई सोडत व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे

डीएचएफएलच्या अल्प मुदतीच्या कर्जरोख्यांत येस बँकेने ३ हजार ७00 कोटी रुपये गुंतवले होते. हा पैसा गुंतवण्याच्या बदल्यात दिवाण हाऊसिंगने राणा कपूर व त्यांच्या कुटुंबियांना तब्बल सहाशे कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. राणा कपूर व कपिल वाधवान यांनी यासाठी कट रचल्याचाही सीबीआयचा आरोप आहे. मुंबईस्थित डीएचएफएलचे याआधीच दिवाळे निघालेले आहे. येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार एप्रिल-जून २0१८ मध्ये सारा कट रचण्यात आला होता. येस बँकेचा पैसा दिवाण डीएचएफएलमध्ये गुंतवण्याच्या बदल्यात दिवाण हाऊसिंगने कपूर कुटुंबाच्या डीओआयटी अर्बन व्हेंचर्स इंडिया प्रा. लि. ला प्रचंड प्रमाणावर पैसा दिला होता. या गैर व्यवहारा प्रकरणी येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना 'ईडी' ने घोटाळ्याच्या चौकशीसाठी बोलवत अटक केली आहे. कपूर यांनी परदेशी पैशांचा गैरवापर करीत काही उद्योग समुहांना कर्ज दिल्याचे चौकशीदरम्यान समोर आले. ते कर्ज बुडित खात्यात गेले आहे. त्यामुळे या उद्योग समुहांवर आता 'ईडी'ने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांची चौकशी सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ही चौकशी या घोटाळ्यातील पुढील तपसासाठी महत्त्वाची असेल, असे इन्व्हेस्टर ग्रीव्हन्स फोरमचे किरीट सोमय्या यांनी सांगितले

 हेही वाचाः- Corona virus : मुंबईत जमावबंदीचा आदेश लागू

या मोठ्या बुडीत कर्जांमध्ये सर्वाधिक १२ हजार ८०८ कोटी रुपयांचे कर्ज प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांच्या अनिल धिरुभाई अंबानी समुहाला (एडीएजी) देण्यात आले. या समुहातील दहा कंपन्यांना हे कर्ज देण्यात आले. ती सर्व कर्जखाती बुडीत खात्यात गेली. यापाठोपाठ ८४१५ कोटी रुपये एस्सेल समुहाला देण्यात आले. समुहातील एकूण १६ कंपन्यांना कर्ज वाटप करण्यात आले. याखेरीज घोटाळा झालेली दिवाण हौसिंग फायनान्स कंपनी (डीएचएफएल), आयएल अॅण्ड एफएस समूह, इंडिया बूल्स, खेतान समूह यांचाही या बुडित कर्जखात्यांमध्ये समावेश आहे. जेट एअरवेज ही विमानसेवा कंपनी अलीकडेच बंद पडल्याने चांगलीच चर्चेत आली. कंपनीच्या डोक्यावर जवळपास ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यापैकी ११०० कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी येस बँकेकडूनही घेतले आहे. ते कर्जखातेही बुडीत खात्यात गेले आहे. विशेष म्हणजे, परदेशी पैशांचा गैरवापर केल्याबद्दल जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल व त्यांच्या पत्नी अनिता यांची ईडीकडून चौकशी सुरूच आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आता जेट एअरवेजची ईडी नव्याने कशाप्रकारे चौकशी करणार? हे औत्सुक्याचे आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा