मुंबई - विमानतळावर सोन्याची तस्करी थांबण्याचं नाव घेत नाहीय. शनिवारी विमानतळावर पुन्हा एकादा दोन किलो सोने पकडण्यात आले आहे. शनिवारच्या कारवाईनंतर फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत तब्बल 13 किलो सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत चार कोटी रूपयांच्या जवळपास आहे.
शनिवारी दुबईवरून आलेल्या नरेश माटा नावाच्या प्रवाशाला संशयावरून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याच्या अंगझडतीत तब्बल सहा सोन्याची बिस्किटे कस्टम विभागाच्या हाती लागली. कस्टमची नजर चुकवण्यासाठी बनियनच्या आत विशेष खिसे करून ही बिस्किटे लपवण्यात आली होती. सोन्याची ही बिस्किटे 1 हजार 700 ग्रॅम वजनाची असून त्याची किंमत 51 लाखांच्या जवळपास आहे.
कस्टमने केलेल्या दुसऱ्या एका कारवाईत बॅंकॉकहून आलेल्या जितेंद्र खिलनानीकडून 400 ग्रॅम वजनाची दोन सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली.