यशराज कंपनीला गंडा घालणाऱ्यांना अटक

रवी दुबे आणि जितेंद्र राठोड अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी मगनलाल ड्रेसवाला कंपनीचा ईमेल हॅक करून ही चोरी केल्याची कबुली दिलीे. या प्रकरणी जुहू पोलिस अधिक तपास करत आहेत.

यशराज कंपनीला गंडा घालणाऱ्यांना अटक
SHARES

प्रसिद्ध चित्रपट निर्माती कंपनी यशराज आणि चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी कपडे भाड्याने देणाऱ्या मगनलाल ड्रेसवाला कंपनीला २ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या दोघा जणांना नुकतीच जुहू पोलिसांनी अटक केली.


ई-मेलद्वारे चोरी

रवी दुबे आणि जितेंद्र राठोड अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी मगनलाल ड्रेसवाला कंपनीचा ईमेल हॅक करून ही चोरी केल्याची कबुली दिलीे. या प्रकरणी जुहू पोलिस अधिक तपास करत आहेत.


'अशी' केली चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३ महिन्यांपूर्वी एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मगनलाल ड्रेसवाला कंपनीकडून यशराज कंपनीने कपडे भाड्यानं घेतले होते. या भाड्याच्या कपड्याचे १ लाख ७५ हजार रुपयांचे देयक ई-मेलद्वारे पाठवले होते. मात्र, पैसे मगनलाल ड्रेसवाला कंपनीच्या खात्यात जमा न झाल्यानं कंपनीच्या मॅनेजरने यशराज कंपनीच्या मॅनेजरकडं पैशांबाबत विचारणा केली. त्यावेळी पैसे एक आठवड्यापूर्वी पाठवल्याचं यशराजकडून सांगण्यात आलं. त्याबाबतचा तपशील ही यशराज कंपनीकडून दाखवण्यात आला.


खातेदाराचा समावेश

अधिक चौकशीत मगनलाल कंपनीच्या अधिकृत ईमेलआयडीवरून हे पैसे एचएसबीसीच्या खात्यात वळवण्यात आल्याचं निदर्शनास आलं. त्यानुसार पोलिसांनी संबधित खातेदार रवी दुबे याला ताब्यात घेतलं. त्याने या गुन्ह्यात जितेंद्र राठोड या त्याच्या सहकाऱ्याचंही नाव पुढे आलं आहे. दोघांनी ईमेल हॅक करून हा गंडा घातल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.



 हेही वाचा -

पावसाळ्याआधी सुरू होणार सांताक्रूझचं गझदरबंध पम्पिंग स्टेशन

अमेरिकेतून मिळाली वांद्रे स्टेशन उडवण्याची धमकी!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा