Advertisement

पावसाळ्याआधी सुरू होणार सांताक्रूझचं गझदरबंध पम्पिंग स्टेशन

मुंबईतील ठिकठिकाणी असलेल्या पम्पिंग स्टेशनपैकी सांताक्रूज येथील गझदरबंध पम्पिंग स्टेशन मुंबईसाठी महत्वाचं पम्पिंग स्टेशन मानलं जातं. पावसाच्या पाण्याचा निचरा करणारं हे पम्पिंग स्टेशन यंदा पावसाळ्याआधीच सुरु होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पावसाळ्याआधी सुरू होणार सांताक्रूझचं गझदरबंध पम्पिंग स्टेशन
SHARES

पावसाळ्यात मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडला की लगेच मुंबईची तुंबई होते. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात पाणी साचतं. हे साचलेलं पाणी समुद्रात फेकण्यासाठी मुंबई महापालिका पम्पिंग स्टेशनचा वापर करते. मुंबईतील ठिकठिकाणी असलेल्या पम्पिंग स्टेशनपैकी सांताक्रूज येथील गझदरबंध पम्पिंग स्टेशन मुंबईसाठी महत्वाचं पम्पिंग स्टेशन मानलं जातं. पावसाच्या पाण्याचा निचरा करणारं हे पम्पिंग स्टेशन यंदा पावसाळ्याआधीच  सुरु होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं गझदरबंध पम्पिंग स्टेशन सुरू झाल्यास अंधेरी, सांताक्रूझ या परिसरातील नागरिकांचं टेन्शन दूर होऊ शकतं.


१५ मेपर्यंत पूर्ण होणार

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत झालेल्या महाप्रलयानंतर मुंबईत ७ नवीन पम्पिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानुसार गझदरबंध पम्पिंग स्टेशन उभारण्याचं काम २०१४ मध्ये महापालिकेने एका कंत्राटदाराला दिलं होतं. हे काम निश्चित वेळेनुसार जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण होणार होतं.

परंतू, या पम्पिंग स्टेशनच्या बांधकामासाठी नेमलेल्या कंत्राटदारानं वेळेत काम पूर्ण न केल्याने त्याला महापालिकेनं फेब्रुवारी महिन्यात त्याला नोटीस बजावली होती. त्यानंतर या कंत्राटदाराला दूर सारुन पम्पिंग स्टेशनच्या बांधकामाचं काम नव्या कंत्राटदाराला देण्यात आलं. एकूण बांधकामापैकी ६५ टक्के बांधकाम पूर्ण झालं आहे. 

'असा' होईल फायदा

येत्या १५ मे पर्यंत हे बांधकाम पूर्ण होण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. सांताक्रूझ येथील गझदरबंध पम्पिंग स्टेशनद्वारे प्रती सेकंदाला ३६,००० लीटर पाणी समुद्रात फेकलं जातं. त्यामुळं हे पम्पिंग स्टेशन सुरू झाल्यास सांताक्रूझ, वांद्रे, खार, जुहू या परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात फायदा होणार आहे.

 


हेही वाचा -

राज ठाकरेंवर गुन्हा नोंदवा; चेंबूरच्या वकीलाची पोलिसांत तक्रार

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी 'रेल सुरक्षा' मोबाइल अॅपची निर्मिती



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा