Advertisement

राज ठाकरेंवर गुन्हा नोंदवा; चेंबूरच्या वकीलाची पोलिसांत तक्रार

निवडणुकांदरम्यान पुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला घडवला जाऊ शकतो, असं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं. राज यांचं हे वक्तव्य त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार एस. बालकृष्णन यांनी तक्रार केली आहे.

राज ठाकरेंवर गुन्हा नोंदवा; चेंबूरच्या वकीलाची पोलिसांत तक्रार
SHARES

शनिवारी पार पडलेल्या मनसेच्या तेराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. निवडणुका सुरू होण्यापूर्वी किंवा निवडणुकांदरम्यान पुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला घडवला जाऊ शकतो, असं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं. राज यांचं हे वक्तव्य त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या या वक्तव्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार एस. बालकृष्णन यांनी तक्रार केली आहे.


चेंबूरमध्ये तक्रार

बालकृष्णन यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात राज यांच्या त्या वक्तव्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ते एका पक्षाचे जबाबदार नेते असून त्यांची वक्तव्य गांभीर्यानं घेतली जात असल्याचं त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. त्यांनी पुलवामासारख्या हल्ल्याचं केलेलं वक्तव्य हे बेजबाबदारपणाचं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


काय म्हणाले होते राज ?

केंद्र सरकार निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामासारखा हल्ला पुन्हा एकदा घडवू शकते, असं वक्तव्य राज यांनी केलं होतं. निवडणुका जिंकण्यासाठी असे प्रकार केले जातात. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे लोक काय करू शकतात असे अंदाज मी बांधू शकतो, असंही राज ठाकरे म्हणाले होते.




हेही वाचा - 

१ जागा ३ इच्छुक; उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी काँग्रेसमध्ये चढाओढ

मतदानासाठी यंदा प्रथमच 'व्हीव्हीपॅट'चा वापर




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा