ट्रेनच्या दारात उभं रहाणं द्रविताला भोवलं, तीन बोटं आणि पायावरून गेली ट्रेन

सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन आणि मस्जिद बंदरच्या दरम्यान अनेक लाईटचे पोल आहेत. याच एका पोलवर हा भुरटा चोर उभा होता. दारात निर्धास्तपणे उभी राहून मोबाईलवर बोलणाऱ्या द्रवितावर त्याची नजर गेली. मोबाईल चोरण्याच्या इराद्याने त्याने हातातली काठी दारात उभ्या असलेल्या द्रविताला मारली. द्रविताच्या डोक्याला जबर मार लागला.

ट्रेनच्या दारात उभं रहाणं द्रविताला भोवलं, तीन बोटं आणि पायावरून गेली ट्रेन
SHARES

एका भुरट्या चोरामुळे चालत्या ट्रेनमधून पडून पाय आणि हाताची बोटं गमावण्याची दुर्दैवी वेळ कल्याणच्या द्रविता सिंगवर आली आहे. त्यामुळे, दारात उभे राहणारे प्रवासी आणि चालच्या ट्रेनमधून या प्रवाशांकडून वस्तू चोरणारे भुरटे चोर हे दोन्ही मुद्दे ऐरणीवर आले आहेत.

ही घटना आहे ७ फेब्रुवारची. सकाळी नेहमीप्रमाणे मुंबईच्या सेंट्रल लाईनवर कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी ट्रेन पकडली. सुरक्षेची खबरदारी म्हणून तिने लेडिज स्पेशल ट्रेन पकडली. फोर्टमध्ये द्रविताचं ऑफिस आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणेच ऑफिसमध्ये जाण्यासाठी द्रविता घरातून बाहेर पडली होती. द्रविता ट्रेनमध्ये फोनवर बोलत होती. ट्रेनमुळे तिच्या मोबाईलचं नेटवर्क गेलं. त्यामुळे मोबाईलवर बोलण्यासाठी ती दारात येऊन उभी राहिली. ट्रेनने सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन सोडलं आणि ट्रेन स्लो झाली.


पोलवर उभ्या भामट्याने मारली काठी

सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन आणि मस्जिद बंदरच्या दरम्यान अनेक लाईटचे पोल आहेत. याच एका पोलवर हा भुरटा चोर उभा होता. दारात निर्धास्तपणे उभी राहून मोबाईलवर बोलणाऱ्या द्रवितावर त्याची नजर गेली. मोबाईल चोरण्याच्या इराद्याने त्याने हातातली काठी दारात उभ्या असलेल्या द्रविताला मारली. द्रविताच्या डोक्याला जबर मार लागला.


जिवावरचं पायावर आणि बोटावर निभावलं!

या धक्क्यामुळे द्रविताचा तोल गेला आणि ती थेट चालत्या ट्रेनमधून बाहेर पडली. बाजूच्या ट्रॅकवर पडलेल्या द्रविताला काही क्षणांतच दुसऱ्या बाजूने दुसरी फास्ट ट्रेन येत असल्याचं समजलं. पहिल्या धक्क्यातून सावरलेल्या द्रवितानं सगळं बळ पुन्हा एकवटलं आणि स्वत:ला ट्रॅकवरून बाजूला केलं.

पण द्रविताचं बळ तोकडं पडलं. या प्रयत्नांमध्ये द्रविता ट्रॅकवरून तर बाजूला झाली, पण तिचा उजवा पाय आणि डाव्या हाताची बोटं फास्ट ट्रेनखाली आली. आसपासच्या लोकांनी लागलीच द्रविताला ग्रँटरोडच्या भाटिया रूग्णालयात दाखल केलं.



संध्याकाळी ४ वाजता तिला भाटिया रुग्णालयात दाखल केलं. डोक्याला मार बसल्यामुळे घटनास्थळीच काही काळ ती बेशुद्ध होती. मात्र नंतर तिला शुद्ध आली. तिच्या उजव्या पायाचं ऑपरेशन करण्यात आलं आहे. डाव्या हाताची ३ बोटं आणि उजवा पाय ट्रेन खाली आला. आम्ही तिचा पाय वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

शैलेश रानडे, प्लॅस्टिक सर्जन, भाटिया रुग्णालय


अल्पवयीन आरोपी अटकेत

जीआरपीने या भामट्या चोराला अटक केली असून तो अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्याविरोधात कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 397 (चोरी) आणि 394(चोरी करताना जाणूनबुजून इजा पोहोचवणे) अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. शिवाय, त्याच्या अटकेनंतर हे मोठं मोबाईल रॅकेट असल्याचं उघड झालं आहे.


आता तरी दारात उभं राहणं थांबवा!

द्रविताच्या प्रकरणामुळे दारात उभ्या रहाणाऱ्या प्रवाशांचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे. डब्यात जागा असूनही दारात उभे राहणारे प्रवासी तोल जाऊन पडल्यामुळे जखमी होणे किंवा प्रसंगी मृत्यू ओढवणे असे प्रकार वारंवार घडत असतात. शिवाय अनेकदा प्रवासी दारात स्टंट करतानाही दिसतात. कदाचित अशा प्रवाशांसाठी द्रवितासोबत घडलेली दुर्घटना आणखीन एक धडा ठरावी!



हेही वाचा

'त्या'ने अनुभवला ट्रेनखाली झोपून अात्महत्या करण्याचा थरार...

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा