Advertisement

'त्या'ने अनुभवला ट्रेनखाली झोपून अात्महत्या करण्याचा थरार...


'त्या'ने अनुभवला ट्रेनखाली झोपून अात्महत्या करण्याचा थरार...
SHARES

थरार अनुभवण्यासाठी कुणी काय करेल, याचा नेम सांगता येत नाही. अाता हेच बघा ना, ट्रेनखाली जीव कसा देतात, हा प्रत्यक्ष थरार अनुभवण्यासाठी एका महाशयानं सोमवारी चक्क ट्रेनखाली झोपण्याचा प्रताप केला. तसंही मुंबईत रेल्वे अपघातात दररोज कित्येक जणांना अापले प्राण गमवावे लागत असताना, कुर्ला इथं या महाभागानं केलेल्या धाडसाचं कौतुक करावं ती त्याला बदडून काढावं, हाच प्रश्न उपस्थितांना पडला होता.काय होता प्रकार?

रविवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास कुर्ल्याच्या पाच क्रमांकावरील प्लॅटफाॅर्मवर एक व्यक्ती उभी होती. समोरून ट्रेन अाल्याचे पाहिल्यानंतर हे महाशय थेट प्लॅटफाॅर्मवर उतरून झोपले. संपूर्ण ट्रेन अंगावरून गेली तरी त्याला साधं खरचटलं सुद्धा नाही. सुरुवातीला त्यानं अात्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असा सर्वांचा समज झाला. पण अात्महत्या कशी करतात, हा थरार अनुभवण्यासाठी त्यानं हे कृत्य केलं.


सीसीटीव्हीत कैद झाला प्रकार

हा व्हीडिओ नीट पाहिला तर ही व्यक्ती जशी ट्रेन प्लॅटफॉर्मवर येते, तेव्हा लगेच ट्रॅकवर उतरते अाणि ट्रॅकवरच झोपते. त्याच्या अंगावरून ट्रेन जाते. प्लॅटफाॅर्मवरील सर्वांच्या काळजाचा ठोका चुकतो. त्याच्या अंगावरुन संपूर्ण ट्रेन जाते. ट्रेन गेल्यानंतर तो उठतो आणि चालायला सुरुवात करतो. त्याला कोणतीही इजा झालेली नसते. एखाद्या सिनेमात थरारपट असावा, असा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


रेल्वेच्या कर्मचाऱ्यानंच केलं हे कृत्य

विश्वास गुलाब बनसोडे असं या व्यक्तीचं नाव आहे. मुख्य म्हणजे विश्वास हे स्वत: रेल्वेचे कर्मचारी आहेत. ते इगतपुरी इथं इलेक्ट्रिकल मेंटनन्स डिपार्टमेंटमध्ये काम करतात. त्यांना या घटनेनंतर कुर्ला आरपीएफच्या ठाण्यात नेण्यात आलं. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला की अाणखी काय, हे समजू शकलं नाही. मात्र या प्रकारानंतर आरपीएफच्या जवानांनी विश्वास यांना कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं अाहे.


हेही वाचा -

फहिमची 'अशी'ही 'मचमच', 'डी गॅंग'च्या नावाने तीन व्यावसायिकांना धमक्या

आता हिंदीत झिंग झिंग झिंगाट...


संबंधित विषय