मशिनमध्ये सापडून कामगाराचा मृत्यू


मशिनमध्ये सापडून कामगाराचा मृत्यू
SHARES

गोरेगावच्या वनराई परिसरातील शांता इंडस्ट्रीमध्ये मशिनच्या दुरूस्तीवेळी एका आॅपरेटरच्या निष्काळजीपणामुळे मशीनमध्ये अडकून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. साहेन मध्देसिया असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी वनराई पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला असून आॅपरेटरला अटक केली आहे.


दुरूस्तीवेळी घटना

 गोरेगावच्या वनराई परिसरात आर.बी.पटेल रोडवर शांता इंड्स्ट्रीज आहे. या माॅडटेक कंपनीत साहेन हा कामाला होता. बुधवारी कंपनीच्या मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे काम थांबले होते. त्यावेळी मशीन दुरूस्तीचे काम करत असताना साहेन मदत करत होता. साहेन मशीनच्या आत असताना मशीन आॅपरेटरने चुकीने मशीन सुरू केली. यामध्ये साहेन गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी ट्रामा रुग्णालयात नेले.मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  



हेही वाचा - 

परदेशी तरूणीला ३ कोटींच्या ड्रग्जसह अटक

गिरगावात गळफास घेऊन तरूणीची आत्महत्या




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा