परदेशी तरूणीला ३ कोटींच्या ड्रग्जसह अटक

नववर्षाच्या पूर्वसंध्येला परदेशातून छुप्या पद्धतीने ड्रग्जची तस्करी केली जाते. त्यामुळे विमानतळावर एआययूच्या अधिकाऱ्यांकडून परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जाते.

परदेशी तरूणीला ३ कोटींच्या ड्रग्जसह अटक
SHARES

मुंबईत नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या  रेव्ह पार्टीत ड्रग्जची तस्करी करण्यासाठी आलेल्या लॅनिस्मेर लुईसा गारसिया लोपेझ (२७) परदेशी महिलेला विमानतळावर ३ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) अटक केली आहे. कपडे लटकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हँगरमध्ये या तरुणीने ड्रग्ज लपवले होके. तरूणी वेनेझुएला येथील रहिवासी आहे. 


दुबईवरून मुंबईत

नववर्षाच्या पूर्वसंध्येला परदेशातून छुप्या पद्धतीने ड्रग्जची तस्करी केली जाते. त्यामुळे विमानतळावर एआययूच्या अधिकाऱ्यांकडून परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जाते. लॅनिस्मेर लुईसा गारसिया लोपेझ ही २४ डिसेंबर रोजी जीआरयू-साओ पाऊलोवरून दुबईला आली. त्यानंतर दुबईवरून तिने मुंबईसाठी विमान पकडले. गिरगाव येथील खेतवाडी परिसरातील एका हॉटेलमध्ये लोपेझ राहणार होती.


सव्वा किलो ड्रग्ज हस्तगत

 विमानतळावर तिच्या संशयित हालचालीमुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला. तिच्या सामानाची तपासणी केली असता त्यात ९ कपड्यांचे हॅँगर सापडले. या हँगरचे वजन जास्त असल्यामुळे ते स्कॅनिंग मशीनमध्ये टाकून त्यांची तपासणी केली. यावेळी हँगरमध्ये मेथाक्‍यूलोन ड्रग्ज असल्याचे निष्पन्न झाले. सर्व हॅँगरमधून जप्त करण्यात आलेले मेथाक्‍युलोन १ हजार २०१ ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ३ कोटी २५  हजार रुपये आहे.


तरूणीला ५ हजार डाॅलर 

या तस्करीत तिला ५ हजार डाॅलर मिळणार होते. ३१ डिसेंबरपूर्वी हा माल तिला पोहोचवण्यास सांगितले होते. त्यामुळे पार्टी ड्रग्स म्हणून प्रसिद्ध असलेले मेथाक्‍यूलोन नववर्षाच्या पूर्वसंध्येसाठी आयोजीत रेव्ह पार्टीसाठी आणण्यात आल्याचा संशय असून त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 



हेही वाचा - 

बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी, शिवसेना उपशाखाप्रमुखाला अटक

गिरगावात गळफास घेऊन तरूणीची आत्महत्या




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा