क्लिनिक चालत नव्हतं म्हणून कांदिवलीतील डॉक्टरने केली आत्महत्या


क्लिनिक चालत नव्हतं म्हणून कांदिवलीतील डॉक्टरने केली आत्महत्या
SHARES

कांदिवली परिसरात एका डॉक्टरने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाविक तलसानिया (२५) असं या डेंटिस्ट डॉक्टरचं नाव असून करियरमध्ये आलेल्या अपयशातून त्याने आत्महत्या केल्याचं समजत आहे.


काय म्हटलंय सुसाईड नोटमध्ये

भाविकने एक सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. त्यात "माझी मानसिक स्थिती ढासळत असून, मी स्वतः ला सांभाळू शकत नाही. म्हणून मी हे पाऊल उचलत आहे" असं लिहिलं आहे ( i think i am becoming a physco and will not be able to handle my self. That's why i am taking this step)



'ते' दृष्य पाहून भावाला धक्का बसला

कांदिवलीच्या इराणी वाडी परिसरात भाविक आपल्या आई आणि लहान भावासोबत रहात होता. बुधवार रात्रीपासून भाविक आपल्या खोलीतच होता. सकाळी जेव्हा भाविकचा भाऊ त्याच्या खोलीत गेला तेव्हा त्याला धक्काच बसला. खोलीत पंख्याला लटकून भाविकने आत्महत्या केली होती. त्याने तात्काळ भाविकाला खाली उतरवलं, पण तोवर खूप उशीर झाला होता. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी भगवती रुग्णालयात पाठवला आहे.


डिस्पेंसरीला प्रतिसाद नव्हता

भाविक पेशाने डेंटिस्ट असला, तरी त्याला व्यावसायात म्हणावं तेवढं यश मिळत नव्हतं. भाविकने मित्राच्या मदतीने विरारला एक डिस्पेंसरी उघडली होती. पण तीन महिने उलटूनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने तो निराश झाला होता. या निराशेतूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं भाविकच्या नातेवाईकांनी संगितलं. वर्षभरापूर्वी भाविकच्या वडिलांचं कर्करोगाने निधन झालं होत, त्याचा देखील भाविकने धसका घेतल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.



हेही वाचा-

'लोन वूल्फ'वर मुंबई पोलिसांची करडी नजर!

नोकरीसाठी जात होते कुवेतला, पोचले जेलमध्ये



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा