नोकरीसाठी जात होते कुवेतला, पोचले जेलमध्ये


नोकरीसाठी जात होते कुवेतला, पोचले जेलमध्ये
SHARES

परदेशात नोकरी करण्याचं, चांगले पैसे कमवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. तुम्हीही नोकरीसाठी परदेशी जाण्याच्या विचारात असाल तर जरा सावध व्हा. नाहीतर तुमच्यावर थेट जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ शकेल. असाच एक प्रकार मुंबई विमानतळावर समोर आला आहे. बनावट कागदपत्र बाळगल्याप्रकरणी सहार पोलिसांनी ३० तरुणांना अटक केली आहे. हे तरुण परदेशात नोकरीसाठी जात होते.


काय आहे संपूर्ण प्रकार?

या तरुणांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, हे सगळे तरूण उत्तर प्रदेशातील असून त्यांना कुवेतमध्ये नोकरी लावण्याचं आमिष देण्यात आलं होतं. नोकरी लावून देणाऱ्या एजंटला या तरुणांनी प्रत्येकी १ लाख रुपये दिले होते. पैसे दिल्यानंतर एजंटने सांगिल्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी हे सगळे मुंबईला आले. सगळ्यांना विमानाने कुवेतला पाठवलं जाईल, असं एजंटकडून सांगण्यात आलं. मात्र विमानतळावर वेगळंच घडलं.


तपासणीत झालं उघड 

विमानतळावर करण्यात येणाऱ्या तपासणीत या तरुणांकडील व्हिजा, पासपोर्ट आणि कागदपत्रं बनावट असल्याचं सीआयएसएफच्या लक्षात आलं. त्यानंतर या सगळ्यांना सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलीस सध्या या तरुणांना फसवणाऱ्या तिघा एजंट्सच्या शोधात आहेत.



हेही वाचा-

सायनमध्ये २ कोटींचं हेराॅईन जप्त

'हिंदमाता'च्या मालकाला अटक



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा