अमेरिकेतील तुरूंगात हेडलीवर हल्ला, प्रकृती गंभीर


अमेरिकेतील तुरूंगात हेडलीवर हल्ला, प्रकृती गंभीर
SHARES

अमेरिकेतील तुरूंगात शिक्षा भोगत असलेला मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड कोलमन हेडलीवर जीवघेणा हल्ला झाल्याची बाब सोमवारी समोर आली आहे. शिकागो तुरूंगात असलेल्या हेडलीवर इतर कैद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे.


कधी झाला हल्ला?

हेडलीवर ८ जुलै रोजी हल्ला झाल्याचं म्हटलं जात आहे. या हल्ल्यात गंभीर जखमा झाल्याने त्याला एव्हेस्टन हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर सीसीयूत उपचार सुरू आहेत. ज्या कैद्यांनी त्याच्यावर हल्ला केला ते कैदी एकमेकांचे भाऊ असून त्यांनी काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील पोलिसांवर हल्ला केला होता.


कधी ठरला दोषी?

अमेरिकेतील न्यायालयाने २४ जानेवारी २०१३ रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोषी ठरवत हेडलीला ३५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार हेडली शिकागोतील मेट्रोपोलिटन सुधार तुरूंगात ही शिक्षा भोगत आहे.


कोण आहे हेडली?

हेडली पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन दहशतवादी आहे. हेडलीनेच २६/११ ची मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची योजना रचली होती. हेडली लष्कर ए तोयबा संघटनेचा अंडरकव्हर एजंट म्हणून काम करायचा. हेडलीने सप्टेंबर २००६ ते जुलै २००८ दरम्यान मुंबईत येऊन महत्त्वाच्या स्थळांची रेकी केली होती. हल्ल्याच्या ठिकाणांचे फोटो, माहिती एकत्रित करून त्याने ही माहिती पाकिस्तानातील प्रमुखांना सोपवली होती.



हेही वाचा-

नालासोपाऱ्यात कुख्यात गुंड राणाचं एन्काऊंटर

तोतया पोलिसांनी २५ लाखांना गंडवलं, ४ जणांना अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा