नालासोपाऱ्यात कुख्यात गुंड राणाचं एन्काऊंटर


नालासोपाऱ्यात कुख्यात गुंड राणाचं एन्काऊंटर
SHARES

नालासोपाऱ्याच्या तुळींजमधील राधानगर परिसर दुपारी गोळ्यांच्या फैरीने दणाणून गेला. अट्टल गुन्हेगार गोविंद राणा आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी राणाचा अचूक वेध घेत त्याला यमसदनी धाडलं. तर या धुमश्चक्रीत २ पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले. राणावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते.


कशी घडली चकमक?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद राणा आपल्या ३ साथीदारांसोबत राधा नगर परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक करण्याचा प्रयत्न केल्यावर राणा आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात मंगेश चव्हाण आणि मनोज सकपाळ हे दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. या हल्ल्यानंतर पोलिसांनी देखील त्याला प्रतिकार केला.


३ गोळ्या लागल्या

प्रत्यक्षदर्शींच्या मते, पोलिसांनी राणाच्या पायांवर पहिली गोळी झाडत त्याला शरणागती स्वीकारण्यास सांगितलं. तरीही राणाने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. एकूण ३ गोळ्या लागल्याने राणाचा जागीच मृत्यू झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असता डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

राणा नालासोपारा पूर्वेकडील एमडी नगर क्र. ५ मध्ये रहात होता. राणाच्या नावे मुंबई, ठाणे, पालघर येथील पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.



हेही वाचा-

तोतया पोलिसांनी २५ लाखांना गंडवलं, ४ जणांना अटक

घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिस अपयशी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा