घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिस अपयशी

शहरातील वाढती गुन्हेगारी आणि गुन्हे उकलीचे प्रमाण रोखण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून सहा हजार कॅमेरे बसवण्यात आले. तरीसुद्धा गुन्हे उकलीच्या प्रमाणात कमालीची असंतुष्ठता आहे. नुसत्या जून महिन्यात १५४ गुन्ह्यांची नोंद असून त्यातील फक्त ३१ गुन्हे उघडकीस आले आहेत.

घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिस अपयशी
SHARES

भारतात सर्वात सुरक्षित शहर अशी मुंबईची ओळख! मात्रा आता ही ओळख हळूहळू धुसर होत आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी आणि गुन्हे उकलीचे प्रमाण रोखण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून सहा हजार कॅमेरे बसवण्यात आले. तरीसुद्धा गुन्हे उकलीच्या प्रमाणात कमालीची असंतुष्ठता आहे. नुसत्या जून महिन्यात १५४ गुन्ह्यांची नोंद असून त्यातील फक्त ३१ गुन्हे उघडकीस आले आहेत.


१०८६ पैकी ४२६ गुन्हे उघडकीस

मुंबईत मागील सहा महिन्यात १०८६ गुन्हे घरफोडीचे नोंदवण्यात आले. त्यापैकी फक्त ४२६ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं. यातील बहुतांश गुन्हे उन्हाळ्यात घडले. उन्हाळ्यात शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर नागरिक घर बंद करून गावी किंवा सहलीला निघून जातात. याचाच फायदा उचलत चोरट्यांनी घरफोडी केली.


तरीही पोलिस अपयशी

शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ऐकीकडे सरकारने शहरात सहा हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभे केले असताना २०१७ मध्ये घरफोडीच्या २४०९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी पोलिसांना फक्त १०४५ गुन्ह्यांचा उलघडा करण्यात यश आलं आहे. तर २०१६ मध्येही परिस्थिती फार काही वेगळी नव्हती. २०१६ मध्ये २५५२ घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असून ११७१ गुन्हे उघडकीस आणले आहेत. वरील आकडेवारी पाहता अर्ध्याहून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरल्याचं दिसून आलं.


इतकी मालमत्ता घरफोडीतून चोरीला

मागील पाच वर्षांत दोन अब्ज ७७ कोटी ६२ लाख ३६ हजार इतकी मालमत्ता घरफोडीतून चोरीला गेली आहे. त्यापैकी उघडकीस आलेल्या गुन्ह्यातून पोलिसांना फक्त ४८ कोटी ७० लाख ३८ हजार किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात यश आलं आहे. म्हणजेच पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील फक्त १७.५ टक्के मालमत्ता हस्तगत केली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकिल अहमद शेख यांना पोलिसांनी दिली आहे.


हेही वाचा - 

नायझेरियन तस्कर ठरतायत पोलिसांची डोकेदुखी

८७ कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दुबईच्या व्यावसायिकाला अटक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा