तोतया पोलिसांनी २५ लाखांना गंडवलं, ४ जणांना अटक


तोतया पोलिसांनी २५ लाखांना गंडवलं, ४ जणांना अटक
SHARES

तोतया पोलिसांनी पेडर रोडवरील एका व्यक्तीला २५ लाख रुपयांना गंडवल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी बँकेच्या सीसीटीव्हीच्या मदतीने गावदेवी पोलिसांनी ४ आरोपींना रविवारी अटक केली. दलिया उर्फ प्रदीप सुमस्ती (५१), अयुब रेहान खान (४०), गणेश सोलंकी (४४) आणि राघवेंद्र (४०) अशी त्यांची नावे आहेत.


कसा घातला गंडा?

पेडर रोड येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या तक्रारदाराला मार्चमध्ये एका अनोळखी महिलेने फोन करून अंधेरी स्थानकाजवळील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावलं. तिथून पुढे ते आंबोलीला गेले. त्या ठिकाणी आणखी एक महिला आधीच हजर होती. या दोघींनी तक्रारदाराला दारू पाजली. त्यांच्यात चर्चा सुरू असतानाच तिथं आणखी एक तरुणी आली. अर्ध्या तासानंतर या ठिकाणी तोतया पोलिसांनी छापा टाकला.


कारवाई टाळण्याची शक्कल

कारवाई टाळायची असेल, तर १० लाख द्यावे लागतील, असं सांगत या तोतया पोलिसांनी तक्रारदाराला घाबरवलं. हा सर्व बनाव खरा मानून तक्रारदाराने त्यांना ५ लाख देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर तक्रारदाराने बाबूलनाथ येथील एका राष्ट्रीयीकृत बॅंकेतील खात्यातून ५ लाख रुपये तोतया पोलिसांना दिले आणि सुटका केली.


पुन्हा गंडवलं

असाच प्रकार मे महिन्यामध्येही घडला. तक्रारदाराला पुन्हा एका महिलेने फोन करून वाढदिवसाच्या निमित्ताने दहिसरला बोलावून घेतलं. तिथंही अंधेरीत छापा घालणारा पोलिस आला. इथं वेश्‍याव्यवसाय सुरू असल्याचं सांगून तक्रारदाराकडे १५ लाख मागितले. तक्रारदाराने या वेळीही तोतया पोलिसाला ५ लाख रुपये दिले. ११ जूनला तोतया पोलिसांपैकी एकजण तक्रारदाराच्या घरी आला आणि उरलेले १५ लाख रुपये घेऊन गेला.

अशाप्रकारे तक्रारदाराला गंडवून तोतया पोलिसांनी २५ लाख रुपये घेतले. तक्रारदाराने हा प्रकार त्याच्या वकील मित्राला सांगितला. त्यानंतर वकिलाच्या सल्ल्यानुसार तक्रारदाराने मे महिन्यात गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी खबऱ्याच्या मदतीने या चौघांना अटक केली.



हेही वाचा-

घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिस अपयशी

लग्नास नकार देणाऱ्या तरुणीला ठरवलं दहशतवादी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा