लग्नास नकार देणाऱ्या तरुणीला ठरवलं दहशतवादी

लग्नास नकार दिल्याचा राग अनावर झालेल्या साईवालाने तरुणीला धडा शिकवण्यासाठी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करत येमेनची तरुणी बाॅम्ब घेऊन विमानात बसल्याची माहिती दिली. या प्रकरणी सहार पोलिसांनी आरोपी कुतुबुद्दिन साईवाला (२९) याच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून त्याला अटक केली आहे.

लग्नास नकार देणाऱ्या तरुणीला ठरवलं दहशतवादी
SHARES

लग्नाला नकार दिल्यानं येमेनच्या तरुणीला तिच्याच प्रियकरानं दहशतवादी ठरवत पोलिस हेल्पलाईनला तिची तक्रार दिल्याची घटना रविवारी उघडकीस आली. तरुणी प्रियकला सोडून मायदेशी परतत असल्यानं तिला थांबवण्यासाठी त्यानं तरुणी बॅगेतून बाॅम्ब घेऊन जात असल्याचा फोन पोलिस हेल्पलाईनला केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी सहार पोलिसांनी आरोपी कुतुबुद्दिन साईवाला (२९) याच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून त्याला अटक केली आहे.


संपूर्ण प्रकार

मूळची येमेनची नागरिक असलेली २७ वर्षीय तरुणी भारतात व्यावयासायानिमित्त ये-जा करत असते. नुकतीच ती औरंगाबाद येथे तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी गेली होती. त्यावेळी तिची ओळख ही साईवालासोबत झाली. तरुणीचा विश्वास जिंकण्यासाठी साईवालाने स्वतःचा व्यवसाय असल्याचं सांगितलं. त्यानंतर दोघांमधील मैत्रीचं रुपांतर कालांतराने प्रेमात झालं. दरम्यान साईवालाने लग्नाची मागणी घातल्यानंतर मुलीने याबाबत तिच्या वडिलांना सांगितलं. त्याप्रमाणे वडिलांनी साईवालाची माहिती काढली असता तो कुणी व्यावसायिक नसून हार्डवेअरचं काम करत असल्याचं पुढे आलं. आपला विश्वासघात केल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने साईवालाला नकार दिला आणि रविवारी मायदेशी निघाली.


प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी...

लग्नास नकार दिल्याचा राग अनावर झालेल्या साईवालाने तरुणीला धडा शिकवण्यासाठी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करत येमेनची तरुणी बाॅम्ब घेऊन विमानात बसल्याची माहिती दिली. त्यानंतर सहा तास सुरक्षा यंत्रणांनी शोध घेत तरुणीला ताब्यात घेतलं. मात्र वस्तूस्थिती पडताळून पाहिली असता तरुणीकडे कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्यानं पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या मदतीने साईवालाला ताब्यात घेतलं. त्यावेळी लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी आपण हे कृत्य केल्याची कबुली साईवालाने दिली.


हेही वाचा -

नायझेरियन तस्कर ठरतायत पोलिसांची डोकेदुखी


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा