बेशिस्त वाहनचालकांना दणका, वर्षभरात २७५४ परवाने रद्द


बेशिस्त वाहनचालकांना दणका, वर्षभरात २७५४ परवाने रद्द
SHARES

वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत असाल... तर सावधान ! तुमचाही वाहतूक परवाना रद्द होऊ शकतो. शहरातील बेशिस्त चालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली असून अातापर्यंत वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या २७५४ चालकांचे परवाने या वर्षभरात रद्द करण्यात अाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत अाहे.


'पिऊन' गाडी चालवण्याचं प्रमाण अधिक

मुंबईत प्राणांतिक अपघातांचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा वाढले असून त्यात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचं अाढळून अालं अाहे. बेशिस्त वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई केली अाहे. तब्बल २७५४ वाहनचालकांचे परवाने पोलिसांनी सरत्या वर्षात रद्द केले अाहेत.


ड्रिंक अँड ड्राइव्हचे गुन्हे

देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईत दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वर्षभरात वाहतूक पोलिसांनी तब्बल १६ हजार ४३७ जणांवर ड्रिंक अँड ड्राइव्हचा गुन्हा नोंदवला अाहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत दंडाची ३.३ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. त्यात २६ ते ३० वयोगटातील मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर वर्षभरात ड्रिंक अँड ड्राइव्हमुळे ११ गंभीर अपघात घडले आहेत. या कारवाईमध्ये १११ महिलांचा समावेश असल्याचे वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.


वयोगट आणि गुन्ह्यांचं प्रमाण

वय
गुन्हे
१८ ते २०
२९७
२१ ते २५
४३६५
२६ ते ३०
४७२९
३१ ते ३५
३७३७
३६ ते ४०
१६४२
४१ ते ४५
८५७
४६ ते ५०
४९४
५१ ते ५८
३१५
एकूण
१६४३७


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा