...या म्युझिशियनने का केली आत्महत्या?


...या म्युझिशियनने का केली आत्महत्या?
SHARES

मुंबईच्या वांद्रे परिसरात एका उद्योन्मुख संगीतकलाकाराने इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. करण थॉमस जोसेफ (29) असे त्याचे नाव आहे.

मूळचा बंगळुरूचा असलेला करण वांद्र्यात त्याच्या मित्राकडे राहात होता. शनिवारी सकाळी त्याचे मित्र आणि मैत्रीण त्याच्या सोबतच होते. सकाळी 8.45 च्या सुमारास सगळे एकत्र बसलेले असताना अचानक त्याने खिडकीतून उडी घेतली. त्यानंतर त्याला भाभा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


तो शुक्रवारी रात्री तीन वाजेपर्यंत दारू पित असल्याचे समोर आले आहे. पण अद्याप आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेल नाही. मूळचा बंगळुरूचा असलेला करण महिन्याभरापूर्वीच मुंबईला आला होता. तो वांद्रे येथील ऋषी शाह नावाच्या त्याच्या मित्राकडे थांबला होता. करण एक पियानो वादक होता. त्याने बंगळुरूमध्ये अनेक कॉन्सर्टदेखील केले होते. मुंबईला तो डीजे म्हणून देखील काम करत होता. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून त्याच्या मुंबईतील मित्रांसह कुटुंबियांचेही जाबाब पोलीस नोंदवून घेत आहेत.


हेही वाचा - 

मुंबईतही सावकारी पाश - वसुलीच्या जाचामुळे एकाची आत्महत्या


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा