मुंबईतही सावकारी पाश - वसुलीच्या जाचामुळे एकाची आत्महत्या

  Bhandup
  मुंबईतही सावकारी पाश - वसुलीच्या जाचामुळे एकाची आत्महत्या
  मुंबई  -  

  सावकाराच्या जाचाला कंटाळून रविंद्र कदम नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना भांडुपच्या नरदासनगरमध्ये घडली आहे. 48 वर्षांच्या कदम यांनी मंगळवारी आपल्या राहत्या घरीच ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

  आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहली आहे. त्यामध्ये धर्मा पाटील, दीपक दुर्गा राजपूत आणि रोशन सिंग यांच्या नावाचा उल्लेख आहे. हे तिघेही कदम यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होते. जर पैसे दिले नाही तर त्यांना धमकीही देत होते. इतकंच नाही, तर या तिघांनी त्यांच्या घराचे कागदपत्रही घेतल्याचे कदम यांनी या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

  सध्या पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता आरोपींना 5 ऑगस्टपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांनी दिली.  हेही वाचा -

  घाटकोपरमध्ये पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.