घाटकोपरमध्ये पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या

Ghatkopar
घाटकोपरमध्ये पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या
घाटकोपरमध्ये पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या
See all
मुंबई  -  

पत्नीची हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घाटकोपर पूर्व येथे घडली. बबिता शिंदे (38) आणि विजू शिंदे (48) अशी या पती-पत्नीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजू शिंदे नेहमीच बबिताच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. या दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याने हे दाम्पत्य वेगळे राहत होते.

या दाम्पत्याला अनिकेत (18) नावाचा मुलगा असून तो कल्याणला त्याच्या मावशीकडे राहतो. तर बबिता घाटकोपर पूर्वेकडीलसाई जेठा इमारतीत राहत होत्या. त्या तेथेच ब्युटीपार्लरही चालवायच्या.


बुधवारी सकाळी विजू शिंदे बबिता यांच्याकडे आला होता. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. या रागातूनच विजूने चाकूने वार करुन बबिताची हत्या केली आणि स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.

अनिकेतने आईला वारंवार फोन केल्यानंतरही बबिता यांनी फोन न उचलल्याने त्याने आपले काका सुनील शिंदे यांना फोन करुन घरी जाऊन आईची विचारपूस करायला सांगितले.

त्यानुसार, सुनील शिंदे बबिता यांच्या घरी गेल्यावर त्यांना घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. आवाज देऊनही त्या दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी त्वरीत पंतनगर पोलिसांना ही बाब सांगितली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडल्यावर त्यांना आतमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेतील बबिता आढळून आली. तर विजूने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसले. पंचनाम्यात पोलिसांना घटनास्थळी रक्ताने माखलेला चाकू मिळाला. या प्रकरणी पंतनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.हे देखील वाचा -

पैशांसाठी त्यानं बायकोलाच बनवलं बहीण!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.