पैशांसाठी त्यानं बायकोलाच बनवलं बहीण!

Dadar (w)
पैशांसाठी त्यानं बायकोलाच बनवलं बहीण!
पैशांसाठी त्यानं बायकोलाच बनवलं बहीण!
See all
मुंबई  -  

सध्याच्या युगात पैशांच्या हव्यासापुढे नातेसंबंधाचीही कुणी पर्वा करत नाही. असाच एक प्रकार शिवाजी पार्क परिसरात समोर आला आहे. इथे भरत उगले (38) नावाच्या शेअर ट्रेडरनं आपल्या पत्नीला चक्क बहीण असल्याचे सांगून एका घटस्फोटित महिलेशी विवाह केला. एवढ्यावरच न थांबता भरतनं आपल्या लॅव्हिश लाईफसाठी तिच्याकडून तब्बल दीड कोटी रुपयेही उकळले. लग्नाच्या पाच वर्षांनी का होईना, पण या महिलेला सत्य परिस्थिती समजली आणि तिने भरतची रवानगी थेट पोलिस कोठडीत केली.

इंग्लिश शिकता शिकता प्रेमात पडला!

डोंबिवलीला राहणारा भरत उगले हा पेशाने शेअर ट्रेडर असून त्यानं 2012 साली दादरमधील सोनल (नाव बदलले आहे) नावाच्या महिलेकडे इंग्लिश स्पीकिंगचा क्लास लावला होता. सोनलचा त्याच दरम्यान घटस्फोट झाला होता. नेमका याचाच फायदा भरतने उचलला. दोघांची मैत्री लवकरच प्रेमात बदलली आणि त्याचवर्षी त्यांचा विवाहदेखील झाला. सोनल गुजराती असल्यानं आपल्या लग्नाला कोणीही येणार नसल्याचं म्हणत भरतने कोर्ट मॅरेजचा पर्याय निवडला. दरम्यान, भरतनं आपल्या पत्नीला चक्क बहीण असल्याचं सांगून विवाहित असल्याचं सोनलपासून लपवून ठेवलं.


छंदीपणा उफाळून आला

लग्न झालं, दोघे एकत्र राहू लागले. त्यानंतर त्यानं सोनलकडून पैसे उकळण्यास सुरूवात केली. सर्वात पहिल्यांदा वडिलांच्या आजारपणासाठी त्यानं सोनलकडून 60 लाख रुपये घेतले. त्यानंतर बहिणीच्या लग्नासाठी 40 लाख रुपये घेतले आणि त्याव्यतिरिक्त आपल्या मौजमजेसाठी तो सोनलकडून वरचेवर पैसे उकळू लागला. असं करता करता चार वर्षे गेली.हे वाचा - डॉक्टरने घेतला मैत्रिणीच्या गालाचा चावामोबाइलमध्ये दिसला मुलीचा फोटो

अचानक एके दिवशी सोनलला भरत, त्याची बहीण आणि एका मुलीचा फोटो भरतच्या फोनमध्ये दिसला. तिने भरतला विचारल्यावर त्यानं त्याबाबत उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर संशयातून जेव्हा सोनलनं चौकशी केली, तेव्हा जे समोर आलं ते ऐकून सोनलच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ज्या महिलेला भरत आजवर त्याची बहीण असल्याचं सांगत होता, ती प्रत्यक्षात त्याची बायको होती. एवढंच नव्हे, तर भरतला एक मुलगी असल्याचंही समोर आलं.


भांडाफोडीनंतर पोलिस ठाण्यात तक्रार

एवढं सगळं कळल्यानंतर सोनल गप्प बसणे शक्यच नव्हतं. तिने भरतला आपले पैसे परत करुन घटस्फोट देण्यास सांगितले. त्यानंतर भरतने पळ काढला. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने सोनलने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार केली. शिवाजी पार्क पोलिसांनी भरतला तत्काळ अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.


हे देखील वाचा - का केली या भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या?डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.