पवईत क्रेन कोसळून 3 कामगारांचा मृत्यू


पवईत क्रेन कोसळून 3 कामगारांचा मृत्यू
SHARES

पवईच्या आयआयटी कॅम्पसमध्ये महापालिकेच्या ड्रेनेज लाईनमध्ये क्रेनची वायर तुटून झालेल्या दुर्घटनेत ३ कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर २ कामगार गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान घडली आहे. काम करताना कामगारांच्या सुरक्षेबाबत कोणतिही काळजी घेण्यात आली नव्हती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून तत्काळ कामगारांना बाहेर काढलं. 

सत्यनारायण सिंग (३२), रामेश्वर समय (४२) आणि विश्वनाथ सिंग (३५) अशी मृतांची नावे असून जखमींमध्ये परेशनाथ सिंग (४९) आणि रामनाथ सिंग (४८) यांचा समावेश आहे.

या प्रकरणी पवई पोलिसांनी अपघाती गुन्ह्यांची नोंद केली असून २ जखमी कामगारांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पवई पोलिसांकडून देण्यात आली असून पोलिस कंत्राटदारांचा शोध घेत आहेत. 


नेमकं काय झालं?

आयआयटी पवईच्या मेन गेटच्या हिरानंदानी रोड, आदी शंकराचार्य मार्गावर महापालिकेच्या कंत्राटदाराकडून ड्रेनेज लाईनच्या खोदकामाचं काम सुरू होतं. याचवेळेस अचानक खासगी ठेकेदाराच्या क्रेनच वायर तुटून क्रेनचं बकेट ५ जणांच्या अंगावर पडलं. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला होताच, अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी १ फायर इंजिन, १ रेस्क्यू व्हॅन आणि एक रुग्णवाहिका पाठवली. या कामगारांना बाहेर काढून घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा