गोवंडीतल्या आगीत तिघे जखमी

 Pali Hill
गोवंडीतल्या आगीत तिघे जखमी

शिवाजीनगर - शुक्रवारी रात्री देवनार डम्पिंग ग्राउंडला लागूनच असलेल्या रफिकनगरमध्ये मोठी आग लागली. या आगीत जवळपास 20 घरं जळून खाक झाली. स्थानिक रहिवाशांच्या मते ही आग घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे लागली. साधारणतः साडे आठच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री 12च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामन दलाला यश आलं. या आगीत तिघे जखमी झाले.

Loading Comments