सायन कोळीवाड्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या

सायन कोळीवाड्यात राहणाऱ्या केतन पाटीलच्या कुटुंबियांचा सायनच्या चंपकलाल इंडस्ट्रीजवळ पान बिडी शाॅपचा व्यवसाय होता. शाळा अर्धवट सोडल्यानंतर केतन घरीच होता. कालांतराने तो व्यसनाच्या आधीन गेला. दिवसाच्या अखेरीस केतन नेहमीच दारूच्या नशेत बुडालेला असायचा. त्यामुळे त्याचे मोजकेच मित्र होते.

  • सायन कोळीवाड्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या
SHARE

सायन कोळीवाड्यात एका ३१ वर्षीय तरुणाने स्वतः वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. केतन पाटील (३१) असं या मृत तरुणाचं नाव आहे. त्याने हे कृत्य का केलं याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या प्रकरणी सायन पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


काय आहे प्रकरण?

सायन कोळीवाड्यात राहणाऱ्या केतन पाटीलच्या कुटुंबियांचा सायनच्या चंपकलाल इंडस्ट्रीजवळ पान बिडी शाॅपचा व्यवसाय होता. शाळा अर्धवट सोडल्यानंतर केतन घरीच होता. कालांतराने तो व्यसनाच्या आधीन गेला. दिवसाच्या अखेरीस केतन नेहमीच दारूच्या नशेत बुडालेला असायचा. त्यामुळे त्याचे मोजकेच मित्र होते.


मित्रांसोबत मद्यपान

गुरूवारी रात्री नेहमीप्रमाणे केतन त्याचा मित्र विनायक उसले आणि इतर २-३ मित्रांसोबत घराशेजारी दारू पिण्यासाठी बसला होता. या ठिकाणी पुनर्विकास प्रकल्प सुरू असल्याने अर्ध्याहून अधिक घरे पाडण्यात आली आहेत. त्यापैकीत एका घराच्या अंगणात हे सर्वजण दारू पिण्यासाठी बसले होते. मध्यरात्री एकच्या सुमारास दारू पिऊन झाल्यावर इतर मित्र निघून गेले आणि केतन तिथं एकटाच फोनवर बोलत बसला.अचानक गोळी झाडली

फोनवर बोलता बोलता त्याने अचानक खिशातून परदेशी बनावटीचं पिस्तुल काढून रागात हवेत एक गोळी झाडली. ही गोळी पत्र्याला लागल्याने कुणीतरी कुत्र्यांना मारण्यासाठई दगड मारल्याचं शेजाऱ्यांना वाटून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर काही वेळाने केतनने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही गोळी केतनच्या डोक्यातून आरपार निघून समोरच्या भिंतीला लागली. त्याचवेळी शेजारी रहात असलेला जयेश नायडू शौचालयात निघाला होता. गोळीचा आवाज एेकून त्याने त्या दिशेने धाव घेतली.


पोलिसांना पाचारण

केतनला रक्ताच्या थारोळ्यात पाहून तो पुरता घाबरला. त्यानंतर त्याने सायन गावातील मुलांना घडलेला प्रसंग सांगितला. तेव्हा सर्वांनी त्या दिशेने घाव घेतली. केतनचा लहान भाऊ मोनिशला फोन लावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने फोन न उचलल्याने सायन पोलिसांना बोलवण्यात आलं.

पोलिसांनी केतनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात नेत अपमृत्यूची नोंद केली. पोलिसांना घटनास्थळी एक परदेशी बनावटीचं पिस्तुल, दोन रिकामी काडतूसे व एक जिवत काडतूस मिळाले. केतन जवळ हे पिस्तूल आलं कुठून? आणि केतनने ऐवढी टोकाची भूमिका का घेतली? याचा पोलिस शोध घेत असल्याचं पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांनी सांगितलं.हेही वाचा-

किर्ती व्यासच्या मारेकऱ्यांना 31 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई हल्ल्याची सुनावणी पाकिस्तानात पुन्हा सुरूसंबंधित विषय
ताज्या बातम्या