‘आॅपरेशन आॅल आऊट’ अंतर्गत ३३ गुन्हेगारांना अटक


‘आॅपरेशन आॅल आऊट’ अंतर्गत ३३ गुन्हेगारांना अटक
SHARES

गंभीर गुन्ह्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी महिन्याभरात दुस-यांना ऑपरेशन ऑल आऊट राबवले असून त्यात मुंबई पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते या कारवाईत १४४८  सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच ३३ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तसेच अंमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत ५३ प्रकरणं दाखल करण्यत आली आहे.

हेही वाचाः- रेस्टॉरंट आणि बार परवाना शुल्कात ५० टक्क्यांची कपात

गुन्हेगार आणि बेकायदेशीर कारवायांविरोधात सक्रिय मोहिम राबविण्यासाठी मुंबई पोलीसांनी २३ डिसेंबरच्या मध्यरात्री सर्वत्र ऑल आऊट ऑपरेशन केले. सह पोलीस आयुक्त ( कायदा व सुव्यवस्था ) विश्वास नांगरे पाटील व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात सर्व मुंबई पोलीस ठाण्यात ही कारवाई पार पाडली. सर्व ५ प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, सर्व १३ परिमंडळ विभागांचे पोलीस उपायुक्त, सर्व विभागांचे सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहिले आणि त्यांनी ऑपरेशनचे वैयक्तिक निरीक्षण केले. प्रत्येक पोलीस ठाण्यांमधुन जास्तीत जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. प्रत्येक कार्य करण्यासाठी समर्पित वैयक्तिक टिमसह अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी , संशयास्पद व्यक्ती व क्रियांसाठी हॉटेल्स, लॉजेस आणि मुसाफिरखानांची तपासणी, संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू जसे की शस्त्रे, ड्रग्स, इ. म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तू, शोधण्यासाठी नाकाबंदीचे व कोम्बिंग ऑपेरशन चे आयोजन, फरार आणि पाहिजे व्यक्तींना अटक करणे,प्रलंबित अजामीनपात्र वारंट आणि स्थायी वारंटची बजावणी,अवैध दारू, जुगार ई. अशा बेकायदेशीर क्रियांवर कारवाई, पोलीस दृश्यमानता वाढविण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि संवेदनशील भागात पायी गस्त ही कामे या ऑपरेशन अंतर्गत हाती घेण्यात आली होती.

हेही वाचाः- राज ठाकरेंना कोर्टाकडून नोटीस, मनसे-अॅमेझॉन वाद चिघळला

गंभीर गुन्हयातील अभिलेखावरील १४४८ गुन्हेगार तपासले त्यापैकी २३८ आरोपी मिळून

आले व ९३ आरोपींवर कारवाई करण्यात आली.

-९  एन.डी.पी.एस कायदयाअंतर्गत गांजा सेवन संदर्भात एकूण कारवाई

-७१५ हॉटेल्स, लॉज, मुसाफिरखाना तपासले.

-११२ ठिकाणी नाकाबंदी दरम्यान ७४२६ वाहनांची तपासणी केली.

-२१३ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.

-१४ अवैध शस्त्रे ( धारदार हत्यारे, ०१ गावठी कट्टा, ०१ देशी रिव्हॉल्वर )जप्त केले.

-२७ अजामीनपात्र वारंट ची बजावणी केली.

- ४३९ महत्वाच्या ठिकाणी पायी गस्त आयोजीत करण्यात आली.

-३३ फरार आणि पाहिजे आरोपीतांना अटक करण्यात आली..

- १० हद्दपार झालेले आरोपी पुन्हा हद्दीत मिळुन आल्याने त्यांच्याविरूध्द मुंबई पोलीस

कायद्यानुसार कार्यवाही करण्यात आली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा