सी लिंकवर आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई - कौटुंबिक त्रासाला वैतागलेल्या व्यक्तीने बुधवारी रात्री वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखत त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.

भाईंदरला राहणारा प्रदीप यादव (37) कौंटुबिक समस्यांना वैतागला होता. त्यामुळे आत्महत्या करण्याच्या इराद्याने तो टॅक्सीने सी-लिंकवर आला. तो सी-लिंकच्या रेलिंगवर चढून समुद्रात उडी मारण्याच्या तयारीत असतानाच सी-लिंकवरील सुरक्षारक्षक तेथे पोहोचले. त्यांनी प्रदीपची समजूत काढण्यास सुरुवात केली. तब्बल 35 मिनिटांच्या प्रयत्नानंतर त्याच्याजवळ पोहोचलेल्या सुरक्षा रक्षकाने त्याला पकडले. त्यानंतर इतर सहकाऱ्यांनी पकडून प्रदीपला ताब्यात घेतले.

Loading Comments