लाचखोर कस्टम अधिकारी अटकेत


लाचखोर कस्टम अधिकारी अटकेत
SHARES

अवैधरित्या साठवून ठेवलेल्या मालाला वाहतुकीची परवानगी देण्यासाठी ५० लाखांची लाच मागितल्या प्रकरणी कस्टमचे चार उपायुक्त, अधिकाऱ्यांसह दोन कर्मचाऱ्यांना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. मुकेश मीना, राजीवकुमार सिंग, सुदर्शन मीना, संदीप यादव या उपायुक्तांसह मनीष सिंग आणि नीलेश सिंग या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. विविध परवान्यांसाठी ही टोळी ५ लाख रुपयांची मागणी करत होती.


सापळा रचून कारवाई

कस्टमच्या न्हावा-शेवा येथील विभागीय कार्यालयात एका व्यापाऱ्याच्या पकडण्यात आलेला अवैध माल ठेवण्यात आला होता. या मालाची वाहतूक करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी व्यापारी मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होता. हा माल देण्यासाठी उपायुक्त मुकेश मीना आणि अन्य अधिकाऱ्यांनी ५० लाखांच्या रकमेची मागणी केली. तडजोडी अंती पाच लाखांचा पहिला हप्ता सोमवारी घेण्याचं ठरलं होतं. मात्र कस्टम अधिकारी मालाच्या किंमतीपेक्षा जास्त पैसे मागत असल्याने व्यापाऱ्याने याबाबत सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. 

याप्रकरणात अन्य दोन उपायुक्त आणि एका अधीक्षकाचाही सहभाग असून, त्यांचा शोध सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. चौघे उपायुक्त तसेच अधीक्षक मनीष सिंग यांच्या कार्यालय आणि घरातील महत्त्वपूर्ण दस्तावेज जप्त करण्यात आले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा