मानखुर्दमध्ये विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

 Mankhurd
मानखुर्दमध्ये विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू
Mankhurd, Mumbai  -  

मानखुर्द - घराबाहेर खेळत असताना विहिरीत पडून एका चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी मानखुर्द परिसरात घडली. पियुष शेलार असे या चिमुकल्याचे नाव असून तो मानखुर्दमधील शिवनेरी नगर भागात राहत होता. गुरुवारी खेळता खेळता त्याचा तोल गेल्याने तो साधारण चार फूट खोल असलेल्या विहिरीत पडला. हे समजताच परिसरातील रहिवाशांनी त्याला तात्काळ एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत मानखुर्द पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे.

Loading Comments