४ वर्षीय मुलाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू


SHARE

वडाळ्याच्या शांती नगरमध्ये ४ वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सरफराज अहमद असं या मुलाचं नाव आहे. सरफराज खेळत असताना त्याला गॅरेजमधील एका उपकरणाचा शाॅक लागला. या प्रकरणी वडाळा टी. टी. पोलिसांनी गॅरेज मालकासह तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

सरफराज रविवारी दुपारी घराबाहेर खेळत होता. त्याच्या घराशेजारीच हे गॅरेज असून गॅरेजमध्ये गाड्यांना रंग देण्यासाठी वापरण्यात येणारे काॅम्प्रेसर ठेवण्यात आले होते. या काॅम्प्रेसरच्या वायर्स जमिनीवरच पडल्या होत्या. या वायर्समध्ये विजेचा प्रवाह सुरू असतानाच सरफराजचा या वायर्सवर पाय पडला आणि त्याला शाॅक लागला. सरफराजला शाॅल लागल्याचं समजताच गॅरेज मालकाने त्याला उचललं पण मुलगा प्रतिसाद देत नाही हे बघताच त्याने सरफराजला तिथेच टाकून पळ काढला. मालकासोबत कर्मचारी देखील पळून गेले. त्यानंतर सरफराजच्या आईने आपल्या मुलाला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.

"आम्ही या ठिकाणी गेल्या २ वर्षांपासून राहात आहोत. असं काही होईल याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. माझ्या मुलाच्या मृत्यूला गॅरेजमालक जबाबदार अाहे," अशी प्रतिक्रिया सरफराजचे वडील एजाझ अहमद यांनी दिली.

"या प्रकरणी आम्ही गॅरेज मालक, रंगाचं काम करणारे आणि गॅरेज कर्मचारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे,'' अशी माहिती वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.हेही वाचा 

भावाला धडा शिकवण्यासाठी ५ वर्षीय पुतण्याला बुडवून मारलं

'तय्यारी शुरू करो!', दाऊद आखतोय मुंबईवर हल्ल्याचा कट?डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय