वडाळा येथील शांतीनगर परिसरात झालेल्या ५ वर्षीय तौसिफ शेख या मुलाच्या मृत्यूचं गूढ उकललं असून तौसिफची हत्या त्याच्या काकांनीच केल्याच समोर आलं आहे. या प्रकरणी वडाळा टी. टी. पोलिसांनी तौसिफचा काका वसीउल्ला शेख (२३) याला अटक केली असून वसीउल्लाचा त्याच्या भावाशी प्रॉपर्टीवरून वाद होता. या वादातूनच त्याने आपल्या भावाला धडा शिकवण्यासाठी पुतण्याची हत्या केली. वसीउल्लाने तौसिफला बुडवून मारल्याचं पोलिसांना सांगितलं आहे.
गुरूवारी रात्री घराबाहेर खेळत असलेला तौसिफ शेख अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर तौसिफच्या घरच्यांनी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटपर्यंत तो सापडला नाही. तौसिफच्या आईने त्वरीत वडाळा पोलीस ठाणे गाठले. पण पोलिसांनी त्यांना सहकार्य केलं नाही. दुसऱ्या दिवशी शांतीनगर येथील खाडी परिसरात मुलाचा मृतदेह सापडला. त्याला तात्काळ सायन रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात तौसिफ एका इसमासोबत जात असल्याचं समोर आलं. तपासात हा इसम तौसिफचा काका वसीउल्ला असल्याचं समोर आलं. त्यानंतर लिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या चौकशीत त्यानंच पुतण्याची हत्या केल्याचं कबूल केलं. वसीउल्ला दीड महिन्यांपूर्वीच तुरूंगातून जामिनावर बाहेर आला होता.
तौसिफचे वडील आणि वसीउल्ला यांच्यात प्रॉपर्टीवरून वाद सुरू होते. वासीउल्लाला औषधासाठी देखील पैसे न दिल्याने त्याचा आपल्या मोठ्या भावावर राग होता. आपण भावाच्या मुलाची हत्या केली, तर भावाला चांगला धडा मिळेल अशा विचारांतून त्याने तौसिफला बुडवून मारल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.
हेही वाचा -
पाच वर्षीय मुलाचा वडाळ्यात संशयास्पद मृत्यू
आयकर विभागाच्या उपायुक्तांना 3 कोटींची लाच घेताना अटक
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)