आयकर विभागाच्या उपायुक्तांना 3 कोटींची लाच घेताना अटक


आयकर विभागाच्या उपायुक्तांना 3 कोटींची लाच घेताना अटक
SHARES

केंद्रीय अन्वेषण विभागाने आयकर विभागाच्या उपायुक्तांना ३ कोटींची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. उप आयकर आयुक्त जयपाल स्वामी यांच्यासह कमलेश शाह नावाचा ज्वेलर आणि प्रथमेश मसडेकर या व्यक्तींना सीबीआयने अटक केली आहे.

व्यापाऱ्याला त्याच्या करात सूट देण्याच्या बदल्यात स्वामींनी ३ कोटी रुपयांची लाच मागितली होती. शुक्रवारी आयकर भवनात स्वामी यांच्या सहकाऱ्याला तीन कोटी रुपये चेकच्या स्वरुपात स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.

सीबीआयने दावा केला आहे की, या तीन कोटी रुपयांच्या बदल्यात कमलेश शाह नावाचा ज्वेलर त्यांना सोने देणार होता. या प्रकरणी एकूण तीन ठिकाणी सीबीआयने धाडी टाकल्या असून काही कागदपत्रे देखील जप्त केली आहेत.



हेही वाचा - 

एसआरए घोटाळ्याप्रकरणी येवले यांच्यावरच भ्रष्टाचाराचा आरोप


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा