एसआरए घोटाळ्याप्रकरणी येवले यांच्यावरच भ्रष्टाचाराचा आरोप

Azad Maidan
एसआरए घोटाळ्याप्रकरणी येवले यांच्यावरच भ्रष्टाचाराचा आरोप
एसआरए घोटाळ्याप्रकरणी येवले यांच्यावरच भ्रष्टाचाराचा आरोप
See all
मुंबई  -  

विक्रोळी पार्क साईट, हनुमान नगर येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण प्रकल्पातील भ्रष्टाचाराबाबत माहिती देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेत स्थानिक नागरिकांनी येवले यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप करत गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.


अद्याप कारवाई नाही

विक्रोळी पार्क साईट, हनुमान नगर येथील अंदाजे ५ हजार कोटी रुपयांच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. बिल्डर ओंकार डेव्हलपर्स यांनी कौशिक मोरे यांच्यातर्फे मला ११ कोटी रुपयांची लाच देण्याचे आश्वासन दिले होते.त्यातील १ कोटी रुपये त्यांनी दिले. त्यापैकी ४० लाख रूपये मी २३ दिवसांपूर्वी माध्यमांसमोर ठेवले होते. त्यानंतर पार्क साईट पोलीस ठाणे, मुंबई पोलीस आयुक्त, लाचलुचपत विभाग, आयकर विभागात तक्रार करण्यास गेलो. मात्र तेथे कोणीही माझी दखल घेतली नसल्याचे येवले म्हणाले.

माझ्याकडे ४० लाख रुपये असल्याने पोलिसांनी मला अटक करावी, अशी मागणी केली असता माझ्यावर देखील कोणतीच कारवाई पोलिसांनी केली नसल्याचे येवले यांनी म्हटले.


१ कोटी रुपयांचा हिशोब

बिल्डरने दिलेल्या १ कोटी रुपयांतील ६० लाख रुपये ज्या २९० लोकांवर खटले सुरू होते, त्यावर प्रत्येकी ५ हजार प्रमाणे खर्च केले. तर उर्वरीत रक्कम मुलुंड उपजिल्हाधिकारी, एसआरए, अपर जिल्हाधिकारी, चर्चगेट असे एकूण १५ हजार रुपये बैठका, झेरॉक्स, पेपर, बॅनर आदींवर खर्च केले. या सर्व खर्चाची पोचपावती माझ्याकडे असल्याचे येवले यांनी सांगितले.


अशा आहेत मागण्या

या प्रकल्पाला स्थगिती मिळावी. योजनेत वाटलेल्या काळ्या पैशांची चौकशी करावी, झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरण, म्हाडातील अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा. विश्वास पाटील हे यातील मुख्य आरोपी असून त्यांनी १३/२ ची नोटीस गहाळ केलेली आहे. सरकारने झोपडपट्टीधारकास ६०० फुटांचे घर द्यावे, तसेच माझ्याजवळील ४० लाख रुपये आदिवासी कल्याण यंत्रणा व अपंगांसाठी खर्च करण्यास शासनाने परवानगी द्यावी.हे देखील वाचा -

झोपु रखडवणाऱ्या 24 बिल्डरांना झोपुचा दणकाडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.