शारीरिक संबंधांसाठी बायकोची केली अदलाबदल

वाइफ स्वॅपिंगमध्ये ( पत्नींची अदलाबदल करणे) पतीच्या तीन मित्रांनी बलात्कार केल्याचा आरोप ३९ वर्षीय महिलेने केला आहे.

शारीरिक संबंधांसाठी बायकोची केली अदलाबदल
SHARES

पतीनेच आपल्या पत्नीवर मित्रांकरवी बलात्कार करवल्याची संतापजनक घटना मुंबईत कांदिवलीमध्ये उघडकीस आली आहे. वाइफ स्वॅपिंगमध्ये ( पत्नींची अदलाबदल करणे) पतीच्या तीन मित्रांनी बलात्कार केल्याचा आरोप ३९ वर्षीय महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून समता नगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. कोर्टाने या आरोपींची रवानगी २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे. 

४६ वर्षीय उद्योजक पतीच्या तीन मित्रांनी २०१७ पासून अनेकवेळा आपल्यावर बलात्कार केला. पतीने एका घटनेचे व्हिडिओ चित्रिकरणही केले असा महिलेने आरोप केला आहे.  आपल्या पतीने वाइफ स्वॅपिंगमध्ये त्या मित्रांच्या पत्नीबरोबर शारिरीक संबंधही ठेवले आहेत. या प्रकाराबाबत जर कुणाला सांगितले तर तुला ठार मारून टाकेल, अशी धमकी आपल्या पतीने दिल्याचाही पिडीत महिलेने आरोप केला आहे. 

पीडित महिलेचा विवाह सन २००३ मध्ये झाला होता. दोघांना दोन मुलेही आहेत. आपल्यावर १५ जून २०१७ रोजी पहिल्यांदा बलात्कार झाला, असं महिलेने सांगितलं आहे. महिलेने सांगितल्यानुसार, १५ जून २०१७ रोजी रात्रीचे जेवण घेतल्यानंतर पतीने त्याच्या मित्राची भेट घालून दिली होती. मित्राच्या कारमध्ये पुढच्या सीटवर बसावे यासाठी पतीने तिच्यावर दबाव टाकला. स्वत: तो त्याच्या मित्राच्या पत्नीसोबत मागच्या सीटवर बसला. त्यानंतर पतीचा मित्र तिची छेड काढू लागला. त्यावर काही होत नाही अशी प्रतिक्रिया पतीने दिली.  

त्यानंतर एका फ्लॅटमध्ये मित्राने  बलात्कार केला. त्याचवेळी तिचा पती मित्राच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवत होता. ऑक्टोबर महिन्यात पतीच्या आणखी एका मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास तिला सांगितले. दोन दिवसांनंतर पतीने आपल्या पत्नीला एका तिसऱ्या मित्राच्या स्वाधीन केले. त्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केला. एका आठवड्यानंतर पुन्हा तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि तो तिच्या पतीसमोरच केला गेला. हा प्रसंगाचे पतीने फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगही केल्याचा महिलेचा आरोप आहे. 



हेही वाचा -

शिवसेनेच्या उपविभागप्रमुखावर विक्रोळीत गोळीबार

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाइल आणण्यास बंदी घालावी, पालक संघटनांची मागणी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा